...म्हणून उपसरपंचाची गाढवावरून काढली मिरवणूक

गावच्या उपसरपंचाला गाढवावर बसवले आणि गावभर फिरवण्यात फिरवण्यात आले. संबंधित फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

भोपाळ (मध्य प्रदेश): रतलाममध्ये सोयाबीनच्या पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने नागरिकांनी वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या परंपरांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. रतलाममधील धराड गावामधील ग्रामस्थांनी गावच्या उपसरपंचाला ढोल ताशांच्या आवाजात गाढवावर बसवून त्यांची गाढवावरून मिरवणूक काढली.

शिक्रापुरातील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा...

पावसासाठी वरुणदेवाला प्रसन्न करावे लागते आणि तसेच गावाच्या प्रमुखाला गाढवावरून फिरवले की चांगला पाऊस होतो, अशी येथील नागरिकांची भावना आहे. दरम्यान, रतलाममध्ये पावसाच्या सुरुवातीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, गेल्या १० दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. तसेच त्यामुळे रुसलेल्या वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत.

मी करंदी गावचा डॉन आहे, तुला रात्री खूप माज आला होता का?

रतलाममधील धराड गावातील नागरिकांनी एका अजब परंपरेच्या माध्यमातून वरुणदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. येथे गावचे उपसरपंच मनोज राठोड यांना गाढवावर बसवून फिरवण्यात आले. त्यावेळी ढोल, नगाऱ्यासारखी वाद्ये वाजवली गेली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवतांची पूजा केली आणि चांगला पाऊस पडावा यासाठी गाऱ्हाणे घातले.

शिरुर तालुक्यात प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या...

दरम्यान, उपसपंचांची गाढवावरून काढलेली मिरवणूक स्मशानात पोहोचली तेथे स्थानिक रिवाजानुसार विधा पार पडले. पूर्वीच्या काळी गावात पाऊस न पडल्यास गावचे राजे गाढवावर बसून फिरून देवतांची पूजा करून पावसासाठी प्रार्थना करत असत. त्याच आधारावर आता गावचे सरपंच आणि उपसरपंच हेच गावचे राजे आहेत. त्यामुळे अशी प्रथा पार पाडल्याने वरुणदेवर राजी होऊन चांगला पाऊस पाडतील, अशी अपेक्षा एका ग्रामस्थाने व्यक्त केली आहे.

शिक्रापुरसह परिसरात विद्युत रोहीत्रांना संरक्षण कवच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: mp news deputy sarpanch sit on donkey and villages rain need