पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले...

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज (शुक्रवार) सायंकाळी बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले होते.

मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेर झालेल्या अपघातातून ते बाचवले. अतिथीगृहाच्या बाहेर असलेले मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. अपघात झाला तेव्हा आदित्य ठाकरे आत बैठक घेत होते. त्यामुळे या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत.

अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव कसं पडलं? घ्या जाणून...

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज (शुक्रवार) सायंकाळी बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले होते. याठिकाणी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर सभागृहात त्यांची बैठक सुरू होती. मात्र आतमध्ये ही बैठक सुरू असताना बाहेरच्या भागात असलेले शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र ही दुर्घटना अत्यंत गंभीर होती. त्यामुळं सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

महत्त्वाची बातमी! सरकारकडून ग्रामपंचायतींसाठी स्पर्धेची मोठी घोषणा...

May be an image of text

सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

दरम्यान, अपघात झाला त्याठिकाणचं बांधकाम हे 25 वर्षांपूर्वीचं आहे. या सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे.

ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय...

Image

कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

हा अपघात बैठक सुरू असलेल्या सभागृहाच्या बाहेरच झाला. त्यामुळे या अपघाता नंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. बैठकीसाठी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे या ठिकाणाहूनच आत गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा वेळ चुकला असता तर अपघाताची शक्यता होती. मात्र सुदैवानं तसे झाले नाही.

शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: mumbai news tourism minister aditya thackeray escaped from a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे