लहान मुले खेळता-खेळता तळ्याजवळ गेली अन्...

मृत पावलेली लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत. सुरुवातीला गणेशमूर्ती शोधासाठी गेल्याची चर्चा होती.

नगरः शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भावडांसह तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कान्हेगावात (ता. श्रीरामपूर) सोमवारी दुपारी ही घटना घडली.

पुणे-नगर महामार्गावर अपघातात चौघांचा जागीच मृत्यू...

दत्ता अनिल माळी (वय 8), चैतन्य अनिल माळी (वय 10), चैतन्य श्याम बर्डे (वय 8) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. कोन्हेगावातील नागरिकांनी अतुल खरात यांच्या शेततळ्यात रविवारी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. सोमवारी दुपारी दत्ता, चैतन्य या दोन भावंडांसह चैतन्य शाळेत चाललो, असे घरी सांगून शेततळ्यावर गेले. पाणी खेळण्यासाठी तलावात उतरले. कुणालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना कळविली. पोलिसांनी मुलाचे मृतदेह तळ्यातून बाहेर काढले. पंचनामा करून शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरेगाव भीमा नदी पात्रात आढळला अनोळखी मृतदेह...

May be an image of 10 people, people standing and text that says 'कारेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदिप विश्वासराव नवले पाटील यांची निवड झाल्याबद्दल हा्िकिनेद शुभेच्छुक शुभमभैय्या नवले आणि मित्र परिवार'

कोरेगाव भीमात किरकोळ कारणातून आईला मारहाण

मृत पावलेली लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत. सुरुवातीला गणेशमूर्ती शोधासाठी गेल्याची चर्चा होती; परंतु खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि पाण्यात बुडून मरण पावल्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सणसवाडीत वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; गालावर तीळ...

शिरूर तालुक्यात अल्पवयीन युवतीवर अत्याचार अन्...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: nagar crime news three child drowned at water in shrirampur