देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; गुन्हा दाखल

व्हिडिओमध्ये गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत चुकीच्या भाषेचा वापर केल्याच आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नाशिक: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

शरद पवार यांनी पक्षाला दिला 'मोठा' आदेश; काय तो पाहा...

देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना स्थितीबाबत आढावा घेतला होता. त्यावेळी  ही घटना घडली होती. यानंतर याबाबत नाशिक रोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी (ता. 1) पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...

व्हिडिओमध्ये काय होते....
या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत चुकीच्या भाषेचा वापर केल्याच आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 'मी शहरात राहिलो असतो तर तुम्हाला बघून घेतले असते.' अशा शब्दांत संकेत भोसले याने गिरीश महाजन यांना उद्देशून फेसबुक अकाऊंटवरून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. सोबतच यात देवेंद्र फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार निदर्शनास येताच भाजपच्या पदाधिका-यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. शिवाय, संशयितांवर कठोर कारवाईची मागणीही केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Video: कोरोनाबाबत शरद पवार यांच्याकडून आवाहन...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

सावधान! कोरोना लस घेतल्यानंतर प्रथम हे कराच...

Title: nashik crime news devendra fadnavis against offensive statem
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे