गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करणे गरजेचे: अशोक पवार

चासकमानच्या अस्तरीकरण कामाचा शुभारंभ करताना अशोक पवार

चासकमान धरणातुन ९०० क्युसेसने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा असताना ते मात्र ४०० ते ४५० क्युसेस पाणी सोडले जात आहे. परंतु त्यात अनेक ठिकाणी चासकमान कालव्याला गळती असल्याने पाण्याच्या अपव्यय होत आहे. तेथील अस्तरीकरण गरजेचे असल्याने शासनाकडुन या कामासाठी ३०० कोटींच्या निधी मिळण्याची अपेक्षा असुन सध्या खेड आणि शिरुर तालुक्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

शिंदोडी: चासकमान धरणातुन ९०० क्युसेसने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा असताना ते मात्र ४०० ते ४५० क्युसेस पाणी सोडले जात आहे. परंतु त्यात अनेक ठिकाणी चासकमान कालव्याला गळती असल्याने पाण्याच्या अपव्यय होत आहे. तेथील अस्तरीकरण गरजेचे असल्याने शासनाकडुन या कामासाठी ३०० कोटींच्या निधी मिळण्याची अपेक्षा असुन सध्या खेड आणि शिरुर तालुक्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातुन जास्त गळती असलेल्या महत्वाच्या ठिकाणी चासकमान कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी केले.

सरपंचाच्या खुर्चीवर कुत्र्याला बसवून घातला फुलांचा हार...

आंबळे (ता. शिरुर) येथील चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानी होते. त्यावेळेस पुढे बोलताना ते म्हणाले चासकमानच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असुन शिरुर तालुक्यात चासकमानच्या अस्तरीकरणसाठी सुमारे ४ कोटी १९ लाखांचा निधी मंजुर झाला असुन अनेक ठिकाणी अस्तरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तसेच शिरुर तालुक्यातील चासकमानच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे . यावेळेस आंबळे, निमोणे, न्हावरे, निर्वी, कोळगाव डोळस, दहिवडी, निमगाव म्हाळुंगी या गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शिरुर तालुक्यातील मोटेवाडी तलाव भरला १०० टक्के

यावेळेस जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापु काळे, चासकमानचे शाखा अभियंता राजेंद्र गोरे, सरपंच सोमनाथ बेंद्रे, प्रकाश बेंद्रे, कळवंतवाडीचे सरपंच दादासाहेब चच्हाण,बाळासाहेब वाघचौरे, अशोक कोळपे, तात्या काळे यांची भाषणे झाली. यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, प्रा भाऊसाहेब भोसले, जेष्ठ कार्यकर्ते विलासराव बेंद्रे, सरपंच सोमनाथ बेंद्रे, उपसरपंच सुनिता जाधव, पुनम बेंद्रे, माजी सरपंच अतुल बेंद्रे, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश बेंद्रे, निर्वीचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक गोरख बेंद्रे, सुत्रसंचालन प्रविण दौंडकर तर आभार दिपक बेंद्रे यांनी मानले.

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG महागले...

Title: Need to make mistakes Ashok Pawar