...अन्यथा संजय राऊतांना पुण्यात फिरु देणार नाही

संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुण्यात फिरुदेणार नाही, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला आहे. संजय राऊत पुणे दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी खोचक टीका केली होती. त्यावरुन भाजप आक्रमक झाल्याचे बघायला मिळाल आहे.

पुणे: संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुण्यात फिरुदेणार नाही, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला आहे. संजय राऊत पुणे दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी खोचक टीका केली होती. त्यावरुन भाजप आक्रमक झाल्याचे बघायला मिळाल आहे.

आमदार अशोक पवार आम्हाला विश्वासात घेतात

जगदीश मुळीक म्हणाले की, संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू, असे वक्तव्य केले आहे. ही धमकी असून कोथळा बाहेर काढण्याचे वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहर भाजपकडून डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज सुद्धा देण्यात आला आहे.

शिरुर तालुक्यातील त्या शिवसेना मेळावा आयोजकावर गुन्हे दाखल

पुढे मुळीक म्हणाले की, 'संजय राऊत हे केवळ एक बोल बहाद्दर आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असतात. ते प्रत्यक्ष फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमतदेखील नाही. कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे राऊत यांनादेखील अटक करावी'. 'जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आंदोलन केले जाईल,' अशा इशारा जगदीश मुळीक यांनी दिला आहे.

​महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: otherwise Sanjay Raut will not be allowed to roam in Pun