शिरुर तालुक्यातील नावारुपाला आलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेतून होतेय पालकांची लुट

धनदांडग्यांसह पुढाऱ्यांच्या पाल्यांना आर्थिक लोभातून मिळतोय प्रवेश

वाबळेवाडी येथे नावारुपाला आलेली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली आंतरराष्ट्रीय ओजस अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळा असून सदर शाळेच्या नावामुळे मुख्याध्यापकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून सदर शाळेतून पालकांची मोठ्या प्रमाणात लुट करुन प्रवेशाबाबत भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे नावारुपाला आलेली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली आंतरराष्ट्रीय ओजस अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळा असून सदर शाळेच्या नावामुळे मुख्याध्यापकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून सदर शाळेतून पालकांची मोठ्या प्रमाणात लुट करुन प्रवेशाबाबत भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवावी; शिवाजीराव आढळराव

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा काही वर्षांपूर्वी दर्जेदार शिक्षणामुळे नावारुपाला आली. त्यामुळे सदर शाळेची दखल अनेक मंत्र्यांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. दरम्यान अनेक मंत्री, राजकीय नेते, अधिकारी यांनी सदर शाळेला भेट देखील दिली, तर काहींनी लाखो रुपयांच्या देणग्या देऊ केल्या. त्यांनतर या शाळेचे नामकरण वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय ओजस अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळा असे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक शाळांनी येथे भेट देत शाळेची माहिती घेतली. शाळेचा नावलौकिक होत असताना शाळेतील मुख्याध्यापकांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पिंपळे जगताप मधून कत्तलीला चाललेल्या चौदा गोमातेंना जीवदान

मात्र जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांना प्रवेश देणे बंधनकारक असताना या शाळेत वेगळाच नियम लादला जाऊ लागला. त्यांनतर शिक्षणाचा बाजार सुरु होऊन येथे प्रवेश मिळविण्यासाठी हजारो रुपये रोख स्वरुपात घेऊन प्रवेश दिला जाऊ लागला. मात्र देणगी बाबत माहिती विचारल्यास प्रवेश नाकारले जाऊ लागले. पैसे देणाऱ्या पालकांच्या पाल्यांनाच येथे प्रवेश देण्यात येऊ लागले असल्याने सध्या शिक्रापूरच्या आजूबाजूच्या गावातील राजकीय नेते, पुढारी, उद्योजक यांसह आदी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मुलांना येथे प्रवेश देण्यात आलेला आहे. या घडत असलेल्या प्रकाराबाबत काही पालकांनी पंचायत समितीकडे तक्रारी देखील केलेल्या असून तक्रारी करणाऱ्या पालकांना दमबाजी करण्याचे प्रकार सुरु झाल्याने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शालेय समितीच्या सदस्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. मात्र शाळेच्या गैरकारभारामध्ये सहभागी असलेल्या शिक्षक तसेच शालेय समितीच्या सदस्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या किसान खात्यातून चक्क २ लाख लंपास

शाळेतील कारभाराबाबत स्थानिकांनाच काही माहिती नाही...
वाबळेवाडी येथील शाळेसाठी आम्ही आमच्या जमिनी दिलेल्या असून शाळा वाढविण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. सध्या शाळा नावारुपाला आलेली असताना शाळेतील शिक्षक शाळेतील कारभाराबाबत आम्हाला काहीही समजू देत नसल्याचे एका स्थानिक युवकाने सांगितले आहे.

शिक्रापुरातून चक्क चारचाकी पिकअप टेम्पोची चोरी...

वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय ओजस अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडे शिष्यवृत्तीचे क्लास चालू असून मी ऑनलाईन पद्धतीने क्लास घेत आहे. सदर प्रकाराबाबत मला काहीही माहिती नसल्याचे उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांनी सांगितले.

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीमध्ये पुन्हा कारवाई...

तक्रारदाराला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव...
शिक्रापूर येथील वाबळेवाडीच्या आंतरराष्ट्रीय ओजस अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळेतील गैरप्रकारांबाबत एका पालकाने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने शालेय समितीच्या सदस्यांकडून सदर पालकाला शिवीगाळ, दमदाटी करत धमकी देण्यात आल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र सदर तक्रार मागे घेण्यासाठी देखील शालेय समितीच्या सदस्यांसह अनेकांकडून सदर तक्रारदारावर दबाव टाकला जात असल्याचे तक्रारदाराने सांगितले.

युवकांनी अनर्थ खर्च टाळून सामाजिक कार्य करावे; प्रमोद फुलसुंदर

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

शिक्रापुरातून चक्क चारचाकी पिकअप टेम्पोची चोरी...

वाबळेवाडी शाळेचा अहवाल पाठविला आहे; विजयसिंह नलावडे
शिक्रापूर येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या असून सदर शाळेचे दप्तर तपासणीसाठी मागविले होते. तसेच सदर शाळेचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या कडे पाठविला असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Parents are being robbed from an international school in Shi
प्रतिक्रिया (1)
 
Sarthak wable
Posted on 18 July, 2021

ही शाळा खूप चांगली आहे