पेट्रोल-डिझेल नंतर आता CNG च्या दरातही वाढ...

इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत, शिवाय महिन्याचे गणित देखील बिघडले आहे. आता त्यामध्ये अधिक भर पडणार आहे.

नवी दिल्लीः देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका उडाला आहे. पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली आहे. डिझेलही महाग होत असताना आता सीएनजीच्या दारातही वाढ झाली आहे. इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत, शिवाय महिन्याचे गणित देखील बिघडले आहे. आता त्यामध्ये अधिक भर पडणार आहे.

शिरुर तालुक्यात प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या...

पेट्रोल-डिझेल आणि LPG सिलेंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. CNGच्या किंमतीत 90 पैसे प्रति किलोग्रामने वाढ झाली आहे. ndraprastha Gas Limited (IGL) ने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

शिरूर तालुका डॉट कॉमचा दणका; नायब तहसीलदार निलंबीत...

दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 90 पैसे वाढ झाली असून, दिल्लीत सीएनजीची किंमत 43.40 रुपये प्रति किलोवरून वाढून 44.30 रुपये प्रतिकिलो झाली आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीएनजी घरगुती किंमती प्रति एससीएममध्ये 26.66 रुपयांवर गेली आहे. तर एनसीआरमध्ये हा दर सीएनजीचे दर 49.08 किलो वरुन 49.98 किलो करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पीएनजीची किंमत प्रति एससीएम 29.61 इतका झाला आहे. पेट्रोलच्या दरात गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा 35 पैशांची वाढ झाली आहे. यासह डिझेल देखील प्रतिलिटर 9 पैशांनी महागले आहे यामुळे गुरुवारी दिल्लीतील पेट्रोल 100.56 रुपयांवर तर डिझेलचा दर प्रतिलिटर 89.62 रुपये झाला आहे.

सत्य हे नेहमी कटूच असते:- माजी सरपंच अनिल नवले

दुसरीकडे याच दरवाढीविरोधात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढीविरोधात आज शेतकरी आंदोलन करणार आहेत. युनायटेड किसान मोर्चाच्या (एसकेएम) मते, डिझेल, पेट्रोल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दोन तासांच्या दरवाढीविरोधात भारतभर निदर्शने होत आहेत. संघटनेने म्हटले आहे की स्कूटर, मोटारसायकली, ट्रॅक्टर, कार, बस, ट्रक इत्यादींच्या माध्यमातून निषेध स्थळांवर आंदोलक पोहोचतील आणि ते रिकामे गॅस सिलिंडर आपल्यासोबत आणतील.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: petrol diesel later cng and png rate hike