पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG महागले...

गॅसच्या किंमती वाढविण्याची 10 दिवसांतली ही दुसरी वेळ आहे. नव्या किंमती आजपासून (बुधवार) लागू होणार आहेत.

नवी दिल्ली: इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने पुन्हा एकदा CNG आणि PNGच्या किंमतीत 2.28 रुपये प्रति किलोने वाढ केली आहे. गॅसच्या किंमती वाढविण्याची 10 दिवसांतली ही दुसरी वेळ आहे. नव्या किंमती आजपासून (बुधवार) लागू होणार आहेत. यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी किमती वाढविण्यात आल्या होत्या. याच बरोबर, या वर्षी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढण्याची ही पाचवी वेळ आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनुसार, सीएनजी आणि पीएनजी दोन रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत आजपासून सीएनजी 49.76 रुपये प्रति किलो तर पीएनजी 35.11 रुपये प्रति एससीएमच्या दराने मिळेल. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी 56.02 रुपये प्रति किलो, तर गुरुग्राममध्ये 58.20 रुपये प्रति किलो मिळेल. पीएनजीच्या संदर्भात, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पीएनजीची प्रति एससीएम किंमत 34.86 रुपये आणि गुरुग्राममध्ये 33.31 रुपये एवढी असेल.

दरम्यान, आयजीएलच्या मते, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी, तर डिझेलच्या तुलनेत 28% कमी आहे.

Title: petrol diesel later cng and png rate hike in india