सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय...

देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण विनामूल्य दिले जाणार आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक आज (बुधवार) पार पडली. यात मोदींनी देशातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. याशिवाय काही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती मंत्री पीयूष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

माध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन संपन्न

मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे आणि शिक्षणासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, 'देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण विनामूल्य दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही योजना लागू असणार आहे आणि यासाठी सरकारने १.३१ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात सुरू असलेल्या मिड-डे मील योजनेची जागा घेणार आहे. राज्यांच्या सरकारांच्या मदतीनं या योजनेची केंद्राकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्थात यातील सर्वाधिक वाटा केंद्र सरकार उचलणार आहे.'

उद्योग क्षेत्रासाठी मॅन्युफॅक्चरिंगबाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात आत्मनिर्भर भारत योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात २१ सप्टेंबरपर्यंत देशात १८५ बिलियन डॉलरची निर्यात झाली असून, गेल्या सहा महिन्यातील हा सर्वोत्तम आकडा आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: PM POSHAN scheme to provide mid day meal to students