पोलीस चौकीत रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी या मालिकेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सस्पेंड झालेला रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा त्याच्या वर्दीमध्ये दिसणार आहे. तो पोलिस चौकीमध्ये ACP रणजीत ढाले-पाटील म्हणून जाणार आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट संजूला देखील माहित नसून तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असणार आहे.

मुंबई: छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी या मालिकेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे संजू आणि रणजीत ढालेपाटील या दोघांनाही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. अवखळ, अल्लड असलेली संजू आता PSI झाली असून घरची आणि कामाची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. यामध्येच आता संजूला एक गोड बातमी मिळणार आहे.

आता 'गाथा नवनाथांची' मालिकेच्या वेळेत झाली वाढ

लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सस्पेंड झालेला रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा त्याच्या वर्दीमध्ये दिसणार आहे. कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तो पोलिस चौकीमध्ये ACP रणजीत ढाले-पाटील म्हणून जाणार आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट संजूला देखील माहित नसून तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असणार आहे.

लतिकाने जिरवला आमदाराच्या पोराचा माज...

रणजीतला त्याची वर्दी परत मिळणार आहे असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसत आहे. कारण या प्रोमोमध्ये नवीन एसीपी साहेबांची एंट्री दाखवण्यात आली आहे. ते ACP म्हणजे रणजीत ढालेपाटील आहे. रणजीतला वर्दीत पाहून संजूच्या तोंडून आपोआप फौजदार असं निघतं आणि तिच्या खास शैलीत TOKKKK करते. दरम्यान, या मालिकेत अनेक रंजक वळण येत असतानाच हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता रणजीतला कशा प्रकारे त्याची वर्दी परत मिळाली हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही NCB ऑफिस आहे

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Police Chowkit Ranjeet Dhalepatil Punha Honar ACP