शिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका...

तीन बायका फजिती ऐका ही म्हणीचा प्रत्येय शिरूर तालुक्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीचा छळ करत तिला माहेरी जायला भाग पाडले. त्यानंतर तिसऱ्या महिलेशी सुत जुळवत एकत्र राहू लागला.

शिक्रापूर : तीन बायका फजिती ऐका ही म्हणीचा प्रत्येय शिरूर तालुक्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीचा छळ करत तिला माहेरी जायला भाग पाडले. त्यानंतर तिसऱ्या महिलेशी सुत जुळवत एकत्र राहू लागला. मात्र, हे करताना अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. करंदी गावातील प्रशांत नप्तेवर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तिसऱ्या अपत्यासह एका महिलेला घरी आणल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तक्रारदार पत्नी जयश्री नप्ते हिच्या तक्रारीवरुन पैशांसाठी छळाचा गुन्हा दाखल केला आणि सगळे प्रकरण उघड झाले. पहिली पत्नी प्रज्ञा नप्ते हीच्या मृत्यूच्या तपासाची संपूर्ण माहिती शिक्रापूर पोलिस मागवित असून प्रशांत नप्ते याच्यासह त्याचे आई-वडील, बहीण व दाजी यांना लवकरच अटक करणार आहोत, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जयश्री यांचे प्रशांत नप्ते यांचेशी जानेवारी 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या पहिल्या महिन्यानंतर लगेच सासू शारदा, सासरा कैलास यांनी छळ करायला सुरवात केली व घरातील खाण्यापिण्याचे पदार्थही ते लपवून ठेवू लागले. पती प्रशांत व सासरे कैलास यांनी दारु पिऊन माहेरुन पैसे आणावेत म्हणून शिवीगाळ-दमदाटी सुरू केली. दरम्यान प्रशांतच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांना घेवून जयश्री व प्रशांत हे चौघे भोसरी (पुणे) येथे रहायला गेल्यावर तिथे नणंद पल्लवी जितेंद्र हरगुडे व नंदावा जितेंद्र हरगुडे (रा.आंबेगाव खुर्द) हे दोघे येवू लागले व त्यांनीही शिवीगाळ, मारहाण करुन छळ करायला सुरवात केली. साधारण एक वर्षानंतर पहिल्या पत्नीची दोन मुले यांना जयश्रीपासून दूर ठेऊन पती, सासू-सासरे व नणंद-नंदावा यांनी सर्वांनी एकत्रितपणे अधिक छळ करायला सुरवात केली व लग्नात काहीच दिले नाही म्हणून भांडी व पैसे मागायला सुरवात केली. याच दरम्यान लग्नात माहेरकडून आलेले सर्व दागिने प्रशांत यांनी मोडून टाकून जयश्री हिचा छळ आणखी वाढवला. या सर्वांना कंटाळून जयश्री माहेरी आल्यावर प्रशांत यांनी स्नेहल गोकुळे नावाच्या एका अपत्यासह असलेल्या महिलेला पत्नीसारखे घरी ठेवून घेतले.

या तक्रारीनंतर कौटुंबीक वादाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलिसांच्या भरोसा सेल मध्ये फौजदार जयश्री कुटे (रांजणगाव पोलिस स्टेशन) यांनी प्रशांत व जयश्री यांचा संसार पुन्हा सुरळीत होण्यासाठीचे प्रयत्न केले. मात्र, जयश्री नप्ते यांच्या ठाम भूमिकेने सदर फिर्याद दाखल झाली असून, पाचही आरोपींना लवकर अटक करणार असल्याची माहिती तपास अधिकारी आदीनाथ शिंदे यांनी दिली.प्रशांत नप्ते याची पहिली पत्नी प्रज्ञा नप्ते हीचा अपघाती मृत्यू 2014 मध्ये झाला. सदर मृत्यू संशयास्पद असून, त्याची चौकशी करण्याची मागणी जयश्री नप्ते यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार दिवंगत प्रज्ञा नप्ते यांच्या अपघाती संशयास्पद मृत्यूची आणि त्याच्या तपासाची सर्व माहिती आम्ही मागवित असल्याचे तपास अधिकारी आदीनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रेमसंबधाताच्या संशयातून त्याने तिचा गळाच चिरला...

Image may contain: text

Title: police complaint register against three marriage shikrapur
प्रतिक्रिया (1)
 
अजय गव्हाणे
Posted on 30 July, 2020

असाच महीलाना न्याय मिळवून दर्या