मोठी बातमी! शरद पवार यांच्या भेटीला देवेद्र फडणवीस...

पवार आणि फडणवीस यांच्या आजच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणार भारतीय जनता पक्षाचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (सोमवार) भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

'रुग्णालयाने केवळ पैसे उकळण्यासाठीच केले उपचाराचे नाटक'

स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी जोरदार टीका केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असे सांगण्यात आले आहे.

शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप समोर येऊ शकला नाही.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

May be an image of text

बहिणीच्या दशक्रियेदिवशीच कोरोनाने घेतला भावाचाही बळी...

दरम्यान, मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणावर राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले होते. त्यातच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही 100 कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष चिघळला आहे. पवार आणि फडणवीस यांच्या आजच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: political big news devendra fadanvis meet sharad pawar at si
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे