Political: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दीपक केसरकरांवर जोरदार टीका

राज्यात ST कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपावरुन केंद्रीयमंत्री Narayan Rane यांनी NCP चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत "Sharad Pawar हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे." ST संपावार तोडगा काढण्यासाठी केंद्राने मार्ग काढावा, असंही राणे म्हणाले आहेत.

सिंधुदुर्ग: राज्यात ST कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपावरुन केंद्रीयमंत्री Narayan Rane यांनी NCP चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत "Sharad Pawar हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे." ST संपावार तोडगा काढण्यासाठी केंद्राने मार्ग काढावा, असंही राणे म्हणाले आहेत.

Shirur: स्वकर्तुत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा योद्धा दादा वाजे

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरही कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली. सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला ? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी टीका राणे यांनी केली.

Koregaon Bhima: विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी सुरु

माध्यमांशी बोलताना केंद्रीयमंत्री राणे म्हणाले, "शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या." मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधान भवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली. मात्र, हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. अशी टीका केंद्रीयमंत्री राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Political Union Minister Narayan Rane Yanchi Deepak Kesarka