विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी...

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने वीजबिल थकल्याने विद्युत प्रवाह खंडित केल्याच्या कारणातून विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशण येथे प्रफुल्ल आल्हाट या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने वीजबिल थकल्याने विद्युत प्रवाह खंडित केल्याच्या कारणातून विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशण येथे प्रफुल्ल आल्हाट या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगार सुरक्षित असणे गरजेचे; जयेश शिंदे

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील विद्युत वितरण विभागाच्या वतीने अनेक दिवस वीज बिल थकलेले असलेल्या ग्राहकांचे विद्युत कनेक्शन बंद करण्याची मोहित हाती घेण्यात आलेली असताना विद्युत वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तू कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील आल्हाट यांचे वीजबिल थकल्याने त्यांचा विद्युत प्रवाह खंडित केला. त्याचा राग मनात धरुन प्रफुल्ल आल्हाट याने विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणी जात त्यांना तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्हाला आमचे वीज कनेक्शन कट करण्याचा अधिकार कोणी दिला. परत आमच्या एरियात आलात तर हातपाय तोडून टाकीन अशी धमकी देत विद्युत कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली.

गणेगाव खालसात बिबट्याने पाडला शेळीच्या ३ करडांचा फडशा...

May be an image of text that says

याबाबत विद्युत वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तू नवनाथ कांबळे (वय ३४) रा. आनंदग्राम सोसायटी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रफुल्ल आल्हाट (पूर्ण नाव माहित नाही) रा. बुद्ध विहार बाजार मैदान तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध शिवीगाळ, दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Power distribution department employee threatened to break l
प्रतिक्रिया (3)
 
तेजस्विनी आशिष गायकवाड
Posted on 20 June, 2021

तुम्ही तुमच्या माहितीनुसार बातमी छापून आणता... नक्की खरं काय घडलं आहे याची कृपया पहिली खात्री करा.. प्रफुल आल्हाट यांचे स्वतःचे वीज कनेकशन कट केले नव्हते ते दरवेळी समाजासाठी भांडत आले आहेत.. प्रथम वायरमन दत्तू कांबळे यांनी अरेरावी केली असताना प्रफुल आल्हाट यांनी प्रतिउत्तर दिले.

प्रज्योत संतोष आल्हाट
Posted on 20 June, 2021

सत्याच्या बाजूने लढणारे आमचे वडील प्रफुल आल्हाट यांना कटकारस्थान करून फसवले जात आहे. प्रथम दत्तू कांबळे यांनी शिवीगाळ केली त्यानंतर प्रफुल्ल आल्हाट यांनी प्रतिउत्तर केले असता मुद्दाम लपून त्यांचा व्हिडिओ बनवून त्यावर कारवाई केली.. हे सगळे मुद्दाम घडवून आणले आहे.. चांगल्या माणसाची बदनामी करता तुम्ही.

तेजस्विनी आशिष गायकवाड
Posted on 20 June, 2021

तुम्ही तुमच्या माहितीनुसार बातमी छापून आणता... नक्की खरं काय घडलं आहे याची कृपया पहिली खात्री करा.. प्रफुल आल्हाट यांचे स्वतःचे वीज कनेकशन कट केले नव्हते ते दरवेळी समाजासाठी भांडत आले आहेत.. प्रथम वायरमन दत्तू कांबळे यांनी अरेरावी केली असताना प्रफुल आल्हाट यांनी प्रतिउत्तर दिले.