प्रभासच्या चाहत्यांना मिळणार खास भेट

पौराणिक कथांपासून ऍक्‍शन मनोरंजन आणि रोम-कॉमपासून सायन्स फिक्‍शनपर्यत भारतीय सुपरस्टार प्रभासने प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे नवनवीन प्रयत्न करत स्वःतला सिद्ध केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आहे.

मुंबई: पौराणिक कथांपासून ऍक्‍शन मनोरंजन आणि रोम-कॉमपासून सायन्स फिक्‍शनपर्यत भारतीय सुपरस्टार प्रभासने प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे नवनवीन प्रयत्न करत स्वःतला सिद्ध केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आहे.

दिवसाढवळ्या घराचा लोखंडी दरवाजा तोडून दागिने चोरी

प्रभासने एक नवे शिखर गाठले असून तो लवकरच आपल्या आगामी २५ व्या चित्रपटाची घोषणा करू शकतो, जी त्याच्या ग्लोबल फॅन्ससाठी एक खास भेट ठरणार आहे. प्रभासचा २५ वा चित्रपट निश्‍चितच अद्‌भूत असणार असून प्रभास लवकरच एका खास गोष्टीची घोषणा करणार आहे. या चित्रपटाशी संबंधित एका व्यक्‍तीने सांगितले की, या चित्रपटाची कथा ही प्रभासच्या आतापर्यतच्या चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटात प्रभास हा कधीही न दिसलेल्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तो पहिल्यांदाच एका ब्लॉकबस्टर दिग्दर्शकासह काम करणार आहे.

शिरूर तालुक्यात टेम्पो चालकाचे अपहरण करुन लुटणारे जेरबंद

भारतीय चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ठरल्यानंतर एखाद्या कलाकाराला एका विशेष भूमिकेत टाइपकास्ट करतात, विशेषतः ज्या प्रकारची चाहत्यांनी अपेक्षा केलेली असते. परंतु प्रभास नक्‍कीच काहीतरी वेगळे करणार असल्याचे दिसून येते. जगभरातील प्रभासचे लाखो चाहते ७ ऑक्‍टोबर २०२१ रोजी त्याच्या २५ व्या चित्रपटाची घोषणा ऐकून निश्‍चितच खूप आनंद होतील, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Prabhasachia Chatyana Minar special visit