बॉलीवूडमध्येही 'प्राची देसाई'चा जलवा

अभिनेत्री प्राची देसाईने टेलिव्हिजन ते बॉलीवूड अशी आपली ओळख निर्माण केली आहे. 'कसम से' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. यानंतर 'रॉक ऑन' चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पदार्पण केले आहे.

मुंबई: अभिनेत्री प्राची देसाईने टेलिव्हिजन ते बॉलीवूड अशी आपली ओळख निर्माण केली आहे. 'कसम से' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. यानंतर 'रॉक ऑन' चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पदार्पण केले आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर प्राची देसाई 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई', 'बोल बच्चन', 'आय मी और मैं' या चित्रपटांतही दिसली होती. प्राची देसाई मागील काही वर्षांपासून चित्रपटातून गायब आहे. मात्र, सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

अभिनेत्री प्राची देसाई मागील काही दिवसांत चर्चेत आली होती. तिने अभिनेता अजय देवगनला सणसणीत उत्तर दिले होते. दरम्यान, अजय देवगणने 'बोल बच्चन' चित्रपटाच्या रिलीझ ऍनिव्हर्सरीला सर्व कलाकारांना सोशल मीडियावर टॅग केले होते. मात्र, काहींना वगळण्यात आले होते. ज्यात प्राचीचा देखील समावेश होता. प्राचीने लिहिले होते की, अजय देवगण तुम्ही चित्रपटाचे अन्य स्टार्स जसे असिन, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंह, असरानी जी, नीरज वोरा आणि जीतू वर्मा यांना टॅग करायला विसरलात ज्यांनी चित्रपट सुपरहिट केला होता.' यामुळे प्राची तिच्या बेधडक ट्‌विटमुळे चर्चेत आली होती.

करंदीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Prachi Desai Cha Jalwa in Bollywood