प्रविण दरेकर महिलांची माफी मागा अन्यथा...

प्रविण दरेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांच्याकडुन खरपुस समाचार

शिरुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी "राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष" असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खरपुस समाचार घेतला असुन "ज्या प्रकारचे वक्तव्य प्रवीण दरेकर तुम्ही केले त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी.

शिरुर: शिरुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी "राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष" असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खरपुस समाचार घेतला असुन "ज्या प्रकारचे वक्तव्य प्रवीण दरेकर तुम्ही केले त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते याची जाणीव ठेवावी" असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

शिरुर तालुक्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचा मोर्चा

बुधवार (दि १३) रोजी पुणे शिरुर येथील साई गार्डन येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रविण दरेकरांसह अनेक दिगजांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना प्रविण दरेकर यांची जीभ
घसरली प्रविण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे. गरीबांकडे पाहण्यासाठी या पक्षाला वेळ नाही. तसेच सुरेखा पुणेकरांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला होता.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

त्यामुळे प्रविण दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना आक्षेपार्ह्य वक्तव्य केले असुन महिलांचा अपमान करणाऱ्यांना योग्य शासन द्या अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली, "आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत असुन तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे, ती दिसून आली. आपल्याच पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांच्या कैवारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मला त्यांची कीव येते. त्या अशा पक्षात काम करत आहेत, ज्यांच्या पक्षाचा हा विचार आहे. तुमचं वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्र पहात असुन ज्या प्रकारचे वक्तव्य तुम्ही केले. त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना जी टीका केलीत.  त्या टीकेची पातळी पण खालच्या दर्जाची होती. तुमच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला आहे, त्यांना चांगलीच शिक्षा देऊ, असा पलटवार राष्ट्रवादीने केला आहे.

सावकारकीला कंटाळून मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Pravin Darekar apologized to the lady otherwise