करंदीत नागरिकांकडून शासकीय नियम पायदळी तुडवून कार्यक्रम...

प्रशासन गुन्हे दाखल करणार का याकडे नागरिकांचे लागले लक्ष

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरे कुंभार येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता करंदी येथे चक्क २० पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येत शासकीय नियम पायदळी तुडवून चक्क १९ जणांनी केले विनामास्क रस्त्याचे काम सुरु केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरे कुंभार येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता करंदी येथे चक्क २० पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येत शासकीय नियम पायदळी तुडवून चक्क १९ जणांनी केले विनामास्क रस्त्याचे काम सुरु केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

शिरुरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख आता गप्प का?

करंदी (ता. शिरुर) येथील कौडाळ मळा या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे पूजन करत रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आलेली आहे. मात्र सदर ठिकाणी रस्ग्त्याचे काम सुरु करत असताना गावातील २० पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येत जेसोबिच्या सहाय्याने रस्त्याच्या कामाचे पूजन केले. मात्र यावेळी चक्क २२ जणांनी एकत्र येत गर्दी करुन कोणतेही अंतर न पाळता चक्क १९ जणांनी तोंडावर मास्क लावलेला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे करंदी मधील कोरोना संपला कि काय असा तसेच येथील नागरिकांना शासकीय नियमाचे भय आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या नियमांची राजकीय नेत्यांकडूनच पायमल्ली

तसेच यापूर्वी अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्याप्रकरणी, क्रिकेटच्या विजयाचा जल्लोष केल्याप्रकरणी, कारची पूजा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करणारे शिक्रापूर पोलीस तसेच शिरुर तहसीलचे महसूल विभाग आता या घटनेचे गांभीर्य पाहून गुन्हे दाखल करणार कि आपल्या कामात दुर्लक्ष करुन नागरिकांना कोरोनाचे नियम मोडून कोरोनाचा प्रसार करण्यास मोकळीक देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहें.

शिक्रापुरात इंधन दरवाढीबाबत कॉंग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध...

फोटो पाहून नक्कीच गुन्हे दाखल केले जाईल; लैला शेख (तहसीलदार)
करंदी (ता. शिरुर) येथे घडलेल्या घटनेबाबत शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता कोरेगाव भीमा येथे दोन दिवसापूर्वी तसेच शिरुर तालुक्यातील ३ ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत सदर ठिकाणच्या तलाठ्यांना गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश देण्यात आलेले असून करंदी येथील फोटोची पाहणी करुन गुन्हे दाखल केले जातील, असे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.ग्रेसचे शिरुर तालुकाध्यक्ष सचिन नरके यांनी सांगितले आहे.

 

Title: Programs by trampling on government rules by citizens in Kar
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे