शिरूर तालुक्यातील मेव्हणीला खूश करण्यासाठी केले नको ते कृत्य...

मेव्हणी काजल हिला खुश करण्यासाठी व आपण चित्रपटातील भाईप्रमाणे काम करतो. हे दाखविण्यासाठी विजय याने जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने पहिला वार करून त्यांचा खून केला.

पुणे : एकाने महिलेबरोबर लग्न करण्याचे नियोजन केले होते. विजय अनिल सूर्यवंशी (वय ३५ रा.जाधववाडी, ता. जुन्नर) याने युवतीला आपली बहादुरकी दाखविण्यासाठी एका युवकाचा निर्घुणपणे खून केला. पोलिसांनी लग्न होण्याऐवजी आरोपींची वरात मंचर पोलिस ठाण्यात काढली आहे.

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिवाय...

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सह्हायक पोलिस निरीक्षक लहु थाटे, पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलिस नाईक नवनाथ नाईकडे, यांच्यासह तीन पोलिस पथकांनी खुनाचा शोध लावला.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

Image

मोठी बातमी! दहावीचा निकाल 'असा' लागणार...

पोलिस तपासात धकादायक माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते सचिन जाधव (रा. धामणी, ता. आंबेगाव) यांच्या खुनातील विजय सूर्यवंशी हा आरोपी आहे. बाळशीराम दगडू थिटे, (रा. धामणी ता. आंबेगाव) व जाधव यांचे आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. थिटे याची मेव्हणी काजल रमेश दाते (वय 27 रा. कवठे ता. शिरूर) हिला खुश करण्यासाठी व आपण चित्रपटातील भाईप्रमाणे काम करतो. हे दाखविण्यासाठी विजय सूर्यवंशी याने जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने पहिला वार करून त्यांचा खून केला. गुन्हा लपवण्यासाठी नामी शक्कल लढवली. घटना स्थळापासून ६० ते ६५ किलोमीटर अंतरावर पारनेर तालुक्यात मृतदेह व गाडीची व विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण येवढे करूनही खुनाला वाचा फुटली.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

Image

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

दरम्यान, लग्नाचे स्वप्न पाहणारा विजय व काजल यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. जाधव यांच्या खिशातील दीड हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन आरोपींनी काढून घेतली होती. सोन्याचे दागिने मंचर पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमप्रकरणातून फेसबुक लाईव्ह करत युवकाची आत्महत्या

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: pune district crime news manchar police two arrested marriag