नाथाभाऊ शेवाळे यांच्यामुळे अपघातग्रस्तांना मिळाली मदत!

अपघातग्रस्त कुटुंबासाठी नाथभाऊ शेवाळे हे देवदूता सारखे धावून गेल्याने त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

शिरुर: सकाळी ८ ची वेळ... मुंबई एक्स्प्रेस हायवेवर एका चारचाकी कारचा अपघात होतो. गाडीत नवरा बायको आणि लहान मुलगा त्यात महिला गंभीर जखमी होते. परंतु, मदतीला कोणीच पुढे येत नाही. अशा संकटात महाराष्ट्र राज्याचे युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे या कुटुंबासाठी अगदी देवदूत म्हणून धावून येतात आणि त्या कुटूंबाला आधार देऊन हॉस्पिटलमध्ये जाण्याची सोय करतात.

शिरूरच्या नायब तहसीलदारांवर तत्काळ कारवाईची मागणी...

महाराष्ट्र राज्य युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे आज (बुधवार) कारेगाव येथून मुंबईला काही कामानिमित्त निघाले होते. त्यावेळेस मुंबई एक्स्प्रेस हायवेवर तळेगाव दाभाडेच्या परिसरात एका मोटारीला अपघात झाला होता. मोटारीमध्ये नवरा-बायको आणि त्यांचा छोटा मुलगा होता. या अपघातात त्या कुटुंबातील महिलेला गंभीर दुखापत झाली होती. नाथाभाऊ शेवाळे यांनी प्रथम त्या अपघातग्रस्त कुटुंबाला मानसिक आधार दिला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

फॅक्ट चेक : कोरोना लस घेतल्यानंतर वस्तू कशा चिकटतात? घ्या जाणून...

शिवाय, हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी गाडीची सोय केली. त्यामुळे त्या अपघातग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. त्या अपघातग्रस्त कुटुंबासाठी नाथभाऊ शेवाळे हे देवदूता सारखे धावून गेल्याने त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अजुनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना स्वतःची पर्वा न करता नाथाभाऊ शेवाळे यांनी त्या अपघातग्रस्त कुटुंबाला मदत करत माणुसकी जपली. यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षकही त्यांच्या सोबत होते.

वरुडेमधील मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिला मदतीचा हात!

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: pune mumbai express way car accident nathabhau shewale help