Video: पुणे-नगर महामार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूककोंडी...

पुणे-नगर महामार्गावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव या ठिकाणी गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार लाईन नसल्याने पाऊस पडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साठते.

रांजणगाव गणपती: कारेगाव (ता. शिरुर) येथे आज (शुक्रवार) दुपारी ४ च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने पुणे-नगर महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे काहीवेळ वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूने गटारलाईन नसल्याने पावसाचे पाणी तुंबत आहे. संबंधित खात्याने याकडे लक्ष द्यावे तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

शिरुरच्या पुर्व भागातील विजउपकेंद्र म्हणजे 'असुन अडचण नसुन खोळंबा'

पुणे-नगर महामार्गावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव या ठिकाणी गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार लाईन नसल्याने पाऊस पडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साठते. त्यामुळे रस्त्यावर पाणी आल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरुन या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा या ठिकाणी गंभीर अपघात झालेले आहेत. त्यामुळे पाऊसाचे हे पाणी जाण्यासाठी गटार लाईन किंवा चेंबर बांधन्यात यावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. 

पार्थ पवार यांच्या कार्यालयावर छापेमारी सुरुच...

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले कि, 'पावसाचे पाणी जाण्यासाठी आम्ही रस्त्याच्या कडेला एक चेंबर बांधला होता. परंतु, कारेगाव ग्रामपंचायतने त्यांचे सांडपाणी त्यात सोडल्याने त्या चेंबरमध्ये कचरा व इतर वस्तू अडकल्याने तो चेंबर जाम झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून तेथील स्थानिक दुकानदारांनी स्वतःच्या दुकानासमोर मुरुम टाकल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यासंदर्भात ग्रामपंचायतीला नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु, त्यांनी अनधिकृत गाळेधारकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.'

कार खरेदी करुन देतो असे म्हणत युवकाची फसवणूक

याबाबत कारेगावचे उपसरपंच संदीप नवले म्हणाले, 'ग्रामपंचायतने मोठी पाईपलाईन टाकुन चेंबरमध्ये पाणी सोडले आहे. परंतु, रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्याने तसेच मुसळधार पाऊस झाल्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते. तसेच अतिक्रमणावर ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.'

शिरूर तालुक्यात घरी आलेल्या सासऱ्याला जावयाकडून मारहाण

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: pune nagar road traffic news rain and traffic jam at karegao