Video: कांचन हॉटेलला भीषण आग...

कांचन हॉटेल आतमधून पूर्ण लाकडाने तयार करण्यात आल्याने आग झपाट्याने पसरली आणि अवघ्या काही क्षणातच संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात आले.

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) मधील कांचन हॉटेलला भीषण आग लागली. आगीमध्ये हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.

तळेगाव ढमढेरे येथे एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

कांचन हॉटेल आतमधून पूर्ण लाकडाने तयार करण्यात आल्याने आग झपाट्याने पसरली आणि अवघ्या काही क्षणातच संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात आले. आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग नेमकी कशा मुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.

अग्निशमन दलाच्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या हॉटेलच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला होता. लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने अवघ्या काही क्षणातच आग झपाट्याने पसरली आणि बघता बघता संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात सापडले. या आगीचे व्हिडीओ आणि फोटोज समोर आले आहेत त्यावरून आग किती भीषण होती हे लक्षात येते. दरम्यान, लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

कवठे येमाई येथे शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

May be an image of text

शिक्रापूरमध्ये पोलिसांची गाडी मद्यपी पोलिस चालकाच्या हाती...

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

Image

शिक्रापूरमध्ये महिलेला मारहाण करत विनयभंग

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: pune solapur highway fire broke out in kanchan hotel yavat
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे