पुणे स्टेशन आणि तळेगावमधून न्हावरा बस सेवा सुरु; पाहा वेळापत्रक...

काँग्रेसच्या वतीने बस चालक व वाहकांचा सन्मान

पुणे स्टेशन आणि तळेगाव ढमढेरे ते न्हावरा बस सेवा सुरु झाली आहे.

शिक्रापूर: नागरिकांच्या मागणी नुसार अनेक ठिकाणी बस सेवा सुरु करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आलेले असताना आता नुकतेच पुणे स्टेशन आणि तळेगाव ढमढेरे ते न्हावरा बस सेवा सुरु झाली आहे. बस चालक व वाहकांचा शिरुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथून न्हावरा येथे प्रवास करण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी येत असल्याने शिरुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बस सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलेली होती. सोमवारपासून (ता. २५) तळेगाव ढमढेरे न्हावरा बस सेवा सुरु करण्यात आलेली असताना सदर बसचे पूजन करत चालक व वाहकांचा सन्मान करण्यात आला.

पुणे ते रांजणगाव एमआयडीसी पर्यंत बस सुरू; वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा....

याप्रसंगी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव, उपाध्यक्ष संतोष शिंदे, अमोल घुमे, सचिन पंडित, जेष्ठ नेते भरत भोसुरे, सुनील ढमढेरे, रजनीकांत ओव्हाळ, वाहतूक नियंत्रक जगन्नाथ भुजबळ, चालक अजय फावडे, आशिष खोले वाहक संतोष अंबावने, जागदिश मुळीक यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना सदर बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांना सोयीस्कर व सुखरूप प्रवास करण्यास मदत होणार आहे, असे मत शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव यांनी व्यक्त केले. यावेळी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

पुणे स्टेशन वरून न्हावरे बस सेवा
सकाळी ४:३० वा
सकाळी ६:३० वा
सकाळी ८:४० वा
दुपारी १:२० वा
दुपारी ३:०५ वा

शिक्रापूर एसटी स्टँडवरुन न्हावरे बस सेवा
सकाळी ८:३५ वा
सकाळी १०:४० वा
दुपारी १२:१० वा
सायं ५:२५ वा
सायं  ७:२० वा
न्हावरे वरुन पुणे बससेवा
सकाळी ९:५५ वा
सकाळी ११:५५ वा
दुपारी ४:४० वा 
सायं ६:४० वा
रात्री ८:३५ वा

न्हावरे वरुन शिक्रापूर एसटी स्टँडला बस सेवा
सकाळी ६:४५ वा
सकाळी ८:४५ वा
सकाळी १०:५५ वा
दुपारी १:३० वा
दुपारी ३:३० वा
सायं ५:३५ वा

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: pune station to navhare and shikrapur to nahvare pmpml bus s