'गदर २' च्या सिक्वेलमध्ये पुन्हा दिसणार अमिषा पटेल

सनी देओल आणि अमिषा पटेलचा 'गदर' २००१ मध्ये रिलीज झाला होता. प्रत्यक्षात या सिनेमात सनी देओल भाव खावून गेला होता, मात्र अमिषा पटेल देखील 'गदर'मधून एकदम हिट झाली होती. आता जवळ जवळ २० वर्षांनी 'गदर'चा सिक्वेल येतो आहे आणि या सिक्वेलमध्येही अमिषा पटेल पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मुंबई: सनी देओल आणि अमिषा पटेलचा 'गदर' २००१ मध्ये रिलीज झाला होता. प्रत्यक्षात या सिनेमात सनी देओल भाव खावून गेला होता, मात्र अमिषा पटेल देखील 'गदर'मधून एकदम हिट झाली होती. आता जवळ जवळ २० वर्षांनी 'गदर'चा सिक्वेल येतो आहे आणि या सिक्वेलमध्येही अमिषा पटेल पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'गदर २ 'ची तयारी जोरात सुरू झाली आहे, असे समजते आहे. अमिषा पटेलने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये आपल्या कमबॅकचे सूतोवाच केले आहे.

प्रभासच्या चाहत्यांना मिळणार खास भेट

'गदर'चे डायरेक्‍टर अनिल शर्मा यांच्याबरोबर 'गदर २′ संदर्भात खूप दीर्घकाळ आणि सविस्तर चर्चा झाली. २०२२ मध्ये 'गदर २′ च्या माध्यमातून पुन्हा येते आहे, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'गदर'मध्ये सनी आणि अमिषा पटेलच्या लहानग्या मुलाच्या रोलमधील उत्कर्ष शर्मा हे देखील आता सिक्वेलमध्ये असणार आहे, असे समजते आहे. अर्थात आता तो २५ ते ३० वर्षांचा झाला असेत. त्याला ओळखता येणार नाही. अमिषाकेडेही वेगळा रोल असणार असेल. तर सनीला आता हातपंप उखडण्यासारखा रोल नक्की नसेल. तो नक्की कसा असे हे समजण्यासाठी थोडी वाट बघितली पाहिजे.

दिवसाढवळ्या घराचा लोखंडी दरवाजा तोडून दागिने चोरी

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Punha Disnar Amisha Patel during Gadar 2 sequel