राजकारणात संवाद हवा वाद नको:- सुजाता पवार

आमच्यावर कायमच वैयक्तीक टिका केली जाते. संवाद व्हावा पण वाद नको. राजकारण नव्हे तर समाजकारण हा आमचा ध्यास असुन सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही कायमच झटत राहणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परीषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी केले.

शिंदोडी: "पराभवामुळे कधीच खचुन जायचं नसतं आणि विजयाने कधीच हुरळून जायचं नसतं या स्वर्गीय रावसाहेब दादांच्या विचाराचा वसा घेऊन आम्ही पवार कुटूंबीय राजकारणात काम करत आहोत. तरीही आमच्यावर कायमच वैयक्तीक टिका केली जाते. संवाद व्हावा पण वाद नको. राजकारण नव्हे तर समाजकारण हा आमचा ध्यास असुन सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही कायमच झटत राहणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परीषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी केले.

कान्हूर मेसाईच्या विद्यार्थ्यांनी घेतली वन्य जीवांची माहिती

गुनाट (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायतच्या १४ आणि १५ व्या वित्त आयोगातून सुमारे ४ लाख ३७ रुपयांचे साहित्य गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेला देण्यात आले. या कार्यक्रमाला सुजाता पवार अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी शाळेला प्रयोगशाळा साहीत्य, संगणक टेबल, एल ई डी, कपाट, तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप जिल्हा परीषद सदस्या सुजाता पवार, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे, जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Video: पुणे-नगर महामार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूककोंडी...

यावेळी बोलताना शिरुर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे म्हणाले, शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे मंजुर केली असुन त्यांच्याकडे विकासाच एक व्हिजन आहे. पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी गावातील जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे असुन सर्वांनी गावात गट-तट विसरुन काम केलं तरच गावचा विकास होईल.

पार्थ पवार यांच्या कार्यालयावर छापेमारी सुरुच...

न्हावरे-शिरुर ग्रामीण गटाचे जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले, गुनाट येथील सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य हे तरुण असुन ते माझ्याकडे सतत वेगवेगळ्या कामाचा पाठपुरावा करत असतात. विकासकांमासाठी गावात जिल्हा परीषदेचा जास्तीत जास्त निधी देण्याचा माझा प्रयत्न असुन निधीची कमतरता येऊ देणार नाही.

शिरुरच्या पुर्व भागातील विजउपकेंद्र म्हणजे 'असुन अडचण नसुन खोळंबा'

यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतिश कोळपे, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे, पोलीस पाटील हनुमंत सोनवणे, सरपंच गणेश कोळपे, उपसरपंच रोहिणी गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य संदेश कर्पे, रामदास काकडे, संध्या बहिरट, नम्रता धुमाळ, सुनिता भगत, सुनंदा कोळपे, सरपंच रंगनाथ भोरडे, ऍड गणेश कर्पे, सतीश सोनवणे, गोरक्ष धुमा , तेजस भगत, अनिल भालेराव, संभाजी वळू व मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Rajkarnat Dialogue Hawa Vaad Nako Sujata Pawar