रांजणगाव पोलिसांनी मोबाईल चोरांना केले २ तासात अटक

कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या किराणा दुकानात पाण्याची बाटली व थंड पेय घेण्याचा बहाणा करुन दुकान मालकाच्या मुलीचा मोबाईल हिसकावून पळुन जाणाऱ्या चोराला मुलीने आरडाओरड केल्याने यश इन चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले

रांजणगाव गणपती: कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या किराणा दुकानात पाण्याची बाटली व थंड पेय घेण्याचा बहाणा करुन दुकान मालकाच्या मुलीचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या चोराला मुलीने आरडाओरड केल्याने यश इन चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्याच्या साथीदाराला दोन तासात तातडीने शोधुन काढत त्याला अटक करण्याची कामगिरी रांजणगाव MIDC पोलिसांनी केली आहे.

पोलिसांच्या पथकाची मटका अड्ड्यावर छापा टाकत धडक कारवाई...

गगनदिप हिरा सिंग (वय २०, रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. बागवान, ता. बाटला, जि. गरदाजपुर, पंजाब) आणि मंगल उर्फ पवन कलवंत सिंग (वय २८, रा. रांजणगाव गणपती, मूळ रा.गवान, ता. बाटला, जि. गरदाजपुर, पंजाब) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रांजणगाव पोलिसांनी मोबाईल चोरांना केले २ तासात अटक

May be an image of text that says

कामगार सुरक्षित असणे गरजेचे; जयेश शिंदे

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १७)  रात्री ९:१५ वाजता कारेगाव येथील यश इन चौकातील किराणा दुकानात दुचाकीवरुन दोन तरुण आले. त्यातील एकजण दुकानात आला त्याने दुकानातील महिलेकडे पाण्याची बाटली व थंड पेयाची मागणी केली. त्यावेळेस त्या महिलेची मुलगी दुकानात होती. ती महिला पाण्याची बाटली आणण्यासाठी दुकानाच्या पाठीमागील बाजूस गेली. हिच संधी साधून त्या तरुणाने दुकानात असलेल्या मुलीच्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला. परंतु, दुचाकी गाडी चालू न झाल्याने तो यश इन चौकाच्या दिशेने पळाला. यावेळी मयुरी ताठे या तरुणीने मोठ्याने आरडाओरडा केल्याने त्यावेळी चौकात ड्युटीवर असणारे पोलीस शिपाई उमेश कुतवळ यांनी लोकांच्या मदतीने त्या चोराला पकडले. 

विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी...

परंतु, त्याचा दुसरा साथीदार पळुन गेला होता. पोलिसांनी तातडीने परीसरात त्याचा शोध घेत त्याला ढोकसांगवी गावच्या हद्दीत परीटवाडी येथून ताब्यात घेतले. याबाबत मयुरी अमोल ताठे (वय २०, रा कारेगाव ताठे महाविद्यालयाच्या पाठीमागे) यांनी फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने हालचाल करुन पळून गेलेल्या दुसऱ्या आरोपीला दोन तासातच अटक केली. दोघांना न्यायालयत हजर केले असता मंगळवार (ता. 22) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींतर्फे वकिल किरण रासकर यांनी काम पाहिले.

विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी...

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक विलास आंबेकर, ज्ञानेश्वर शिंदे, वैज्जनाथ नागरगोजे, पोलीस शिपाई उमेश कुतवळ यांनी हि कारवाई केली. पुढील तपास PSI सुभाष मुंढे करत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Ranjangaon police arrested mobile thieves in 2 hours