रावसाहेब करपे यांची लीगल सेलच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती...

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील माजी सरपंच रावसाहेब आप्पासाहेब करपे यांची पुणे जिल्हा काँग्रेस लीगल सेलच्या सचिवपदी निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देखील देण्यात आले आहे.

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील माजी सरपंच रावसाहेब आप्पासाहेब करपे यांची पुणे जिल्हा काँग्रेस लीगल सेलच्या सचिवपदी निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देखील देण्यात आले आहे.

Video: नवरदेव भर मंडपात झाला रोमँटिक...

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील माजी सरपंच रावसाहेब आप्पासाहेब करपे यांचे वकील क्षेत्रात मोठे कार्य व योगदान असून त्यांच्या कार्यांची दखल घेत त्यांची पुणे जिल्हा काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष राहुल ढाले यांनी निवड करत निवडीचे पत्र आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिले आहे.

Video: लग्नमंडपातच नवरीने काढला तोंडातून धूर...

May be an image of text that says

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अलकाताई राठोड, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, शिरुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, शिरुर तालुका अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अजीम सय्यद, पुणे जिल्हा पर्यावरण विभागचे उमेश काळे, शिरुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण आंबेकर, शिरुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमजद पठाण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Raosaheb Karpe appointed as District Secretary of Legal Cell