शेरखान! बस्स नाम ही तो काफी है !

शेरखान म्हणजे विचारांची सुंदरता, ज्या कुटुंबात ते जन्माला आले, त्या कुटुंबाला पुरोगामी विचारांचा वारसा आहे.

जातिवंत सौंदर्याला मी सुंदर आहे, हे सांगावं लागत नाही. ज्यांच्याजवळ विचारांच, आचाराच सौंदर्य असत त्यांची पण वेगळी ओळख करून द्यावी लागत नाही. होय मी पत्रकार, सर्पमित्र, प्राणीमित्र, एक कलाकार असलेल्या शेरखान शेख यांच्याबद्दलच सांगतोय. त्यांची ओळख मी करून देणं म्हणजे हिमालयाच्या सौंदर्याचे वर्णन एखादया टेकडीने करावे तसा प्रकार होईल, अशा माणसांचे सौंदर्य त्यांच्या प्रत्येक कृतीतून झिरपत असते.

शेरखान म्हणजे विचारांची सुंदरता, ज्या कुटुंबात ते जन्माला आले, त्या कुटुंबाला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. म्हणूनच स्वतःच्या मुलीच्या जन्माचं स्वागत त्यांनी पेढे वाटून केले. हॉस्पिटल पासून घरापर्यंत त्या छोटयाशा परीला मिरवत आणलं. शेरखान शेख म्हणजे मला एक न उलगडलेले कोडं आहे. हिमनगाचा जसा एक अष्टमांश भागच आपण पाहतो तस.. तो भाग म्हणजे हिमनग नसतोच मुळी. तसेच शेरखान यांच आहे. युवा मित्राला अनुभवताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक पैलू मला अचंबित करतो. समाजातील उपेक्षितांचे अश्रू पुसताना आणि अन्याया विरुद्ध त्यांच्या धारदार लेखणीला विजेचं तेज प्राप्त होत, तर समाजासमोर सकारात्मक बाब ठेवताना व कौतुक करताना लेखणी फुलांहूनही कोमल बनते. शब्दांशी खेळणारा हा अवलिया कधीं कधीं रौद्र रूप धारण करणाऱ्या विषारी नागराजाला आपल्या मर्जीने डोलायला लावतात. पक्षीप्रेमी असणाऱ्या शेरखान यांच्या घराभोवती अनेक प्राणी व पशुपक्ष्यांचे दर्शन घडते. तर त्यांच्या घरामध्ये प्रवेश करताच समोरील भितीवरील पुरस्काराने त्यांच्या कार्याची ओळख होते. एखाद्या गाण्याच्या व चित्रपटाच्या चित्रीकरणात त्यांच्यातला अभिनेता दडलेला असतो. शेतात काम करताना ते हाडाचे शेतकरी वाटतात. नानाविध भूमिका लीलया वठविणारा हा बहुरंगी, बहुढंगी बहुरूपी आपला मित्र कधी बनून गेला हे आपल्यालाही कळत नाही.

जीवन हे जगण्यासाठी असून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं सोन करा हा त्यांच्या जीवनाचा भाव आहे. त्यांच्या वागण्या बोलण्याला ताल असल्याने ते बेताल होत नाही. म्हणूनच ते साऱ्यांना हवेहवेसे वाटतात. मुळात शेरखान यांचा जन्म १० जून रोजी वटसावित्री पौर्णिमेचा, हिंदू संस्कृतीत त्या दिवशी वड पूजतात. त्याला अक्षय वृक्ष असेही म्हणतात. त्याच्या मुळ्या जमिनीत येतात व मातीशी घट्ट नात सांगतात. कदाचित ह्या दिवशी जन्म झाल्यामुळे शेरखान शेख यांचेही समाजातील प्रत्येक घटकाशी असे घट्ट नाते आहे. लहानापासून थोरांपर्यंत, कामगारांपासून प्राध्यापकांपर्यंत, साध्या सामान्य माणसापासून राजकारण्यापर्यंत सर्वांना ते आपले वाटतात. सकारात्मक दृष्टी ही त्यांना लाभलेली दैवी देणगी आहे आणि सळसळता उत्साह त्यांच्या नसानसात भरून राहिला आहे. अशा या चतुरस्त्र पत्रकार, निसर्गप्रेमी, कुटुंबवत्सल, सहृदय मित्र, हरहुन्नरी कलावंत, माणूसवेड्या दिलदार 'शेर' मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आखीर शेर तो शेर होता है ना...

शब्दांकन - प्रा. अनिल शिंदे (विद्याधाम माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई)

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: reporter sherkhan shaikh birthday write prof anil shinde art