एक दिलदार हस्ती शेरखान शेख...

शेरखान शेख यांना प्राणी, पक्षी व निसर्गाविषयी प्रेम असून ते सर्पमित्र व प्राणीमित्र आहेत, हजारो साप, वन्य जीव तसेच कत्तलीपासून आपल्या गोमाता व जनावरांना त्यांनी जीवदान दिले.

लेखाच्या शीर्षकावरुनच तुम्हाला समजले असेल की, शेरखान शेख नेमके काय आहेत, तरी मी त्यांचे व्यक्तिमत्व आज आपणासमोर मांडणार आहे. खर तर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना किंवा लिहिताना आपण म्हणतो, अरेच्चा आता या बद्दल मी काय बोलू. परंतु, शेरखान शेख हे अस व्यक्तिमत्व आहे कि मला वाटत त्यांच्या बद्दल मी काय काय बोलू कारण ते आहेच हुरहुन्नरी...

लोक नेहमी त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या नावापुढे निर्भीड हे शब्द विशेषण लावतात. पण, मला वाटते निर्भीड या शब्दामुळे शेरखान यांच्या नावाला शोभा नाही तर शेरखान शेखच निर्भीड शब्दाचे उगमस्थान आहेत. अनेकदा हे त्यांच्या कृतीतून दिसून देखील येते. ते म्हणजे निर्भीडपणे गैरकृत्यांविरोधात आवाज उठविले, समाजात घडत असलेल्या घटना, अत्याचार, शारीरिक छळ करणाऱ्या विकृती, गरिबाने केलेले कार्य, शालेय मुलांच्या कीर्ती, पडद्यामागे असलेल्या कलाकारांना उजेडात आणने, गरिबांना मदत मिळवून देणे यांसह आदी बाबींबाबत निरपक्षपणाने आवाह उठवून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. समाज कंटकांच्या विरोधात धोका पत्कारून आवाज उठवून वाईट चालींना देखील तोंड ते देतात. आजच्या काळात समाजात चांगली कामे अनेकजण करतात. परंतु, त्या कामादरम्यान अडथळे आले तरी पण न डगमगता, न घाबरता त्याला तोंड देण्याची ताकद सर्वांमध्ये नसते. म्हणूनच शेरखान हे नाव या व्यक्तिमत्वाला साजेसे आहे. गोरगरीब, लहान मुले, तरुण वर्गांबरोबरच सांस्कृतिक व सांप्रादायिक क्षेत्रातील मंडळी यांना देखील शेरखान शेख हे हवेहवेसे वाटतात. यामागील करण म्हणजे त्यांचे सर्वांशी प्रेमाने बोलणे, प्रत्येकाची जवळून विचारणा करणे, गरिबांना मदत करणे यामुळे त्यांचा नावलौकिक सर्वत्र आहे.

शेरखान! बस्स नाम ही तो काफी है !

शेरखान शेख याचे संपूर्ण नाव शेरखान सिकंदर शेख. वय ३४ वर्षे. ते स्वतःचा छोटासा व्यवसाय करत शेती करुन त्यांची उपजीविका करतात. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले पत्रकार असून कामाच्या बाबतीत न लाजणारा माणूस आहे. दिवसभर एसीच्या गाडीत फिरले, कडक कपडे घातले तरी कोणत्याही कामाच्या वेळी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतात. त्यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. अनेकदा लोक त्यांची सामाजिक प्रतिमा ऐकून त्यांना आवर्जून भेटतात. मात्र, भेटल्यानंतर हेच ते शेरखान शेख का? असा प्रश्न त्यांना पडल्या शिवाय राहत नाही.

शेरखान शेख यांना प्राणी, पक्षी व निसर्गाविषयी प्रेम असून ते सर्पमित्र व प्राणीमित्र आहेत, हजारो साप, वन्य जीव तसेच कत्तलीपासून आपल्या गोमाता व जनावरांना त्यांनी जीवदान दिले. मात्र, कोणताही स्वार्थ न बाळगता हे सर्व काम ते करतात. साप मारणाऱ्या व्यक्तीवर कारवाई, सर्पदंशावर जादूटोणा करणाऱ्यावर कारवाई करत साप चावलेल्या माणसांसह जनावरांचे प्राण त्यांनी स्वखर्चाने वाचवले आहे. यावेळी अनेकांना शेक्र्हन शेख हे देवदूत असल्याचे दर्शन होऊन लोकांना आश्रू अनावर झाले आहेत. कोरोना काळामध्ये गरीब गरजूंना मित्रांच्या मदतीने अन्नाची सोय करणे. रात्री-अपरात्री भटकलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी सोडणे, गरीब शालेय मुलांना मदत करणे, पशु पक्षांना अन्न पाण्याची सोय करणे. अनाथांना मदतीसाठी झटणे यांसह अनेक समाजपयोगी एक, दोन दिवस नव्हे तर दैनंदिन जीवनात ते करत असतात.

प्रत्येक मित्र, नातेवाईक, अनोळखी व्यक्ती, गरिबांना हवेहवेसे वाटणारे तसेच विचार करून देखील या व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी शब्द कोणाच्याही शब्द कोशात सापडणार नाही. जास्त नाही फक्त एवढेच बोलेल आज आम्हाला शेरखान शेख यांच्या रूपाने जो मित्र, भाऊ, मार्गदर्शक, आधार असे अनेक विशेषणे कमी पडणारा व्यक्ती मिळाला त्यासाठी मी सर्पमित्र श्रीकांत बाळासाहेब भाडळे देवाचे मनापासून आभार मानतो. आमची मैत्री अशीच चिरकाळ टिकावी व जीवाला जीव देणाऱ्या या महान पुरुषाला उत्तम आयुष्य लाभो अशी प्राथना करून मी त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो...

शब्दांकन: सर्पमित्र श्रीकांत भाडळे (वन्य पशू-पक्षी संरक्षण सामाजिक संस्था)

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: reporter sherkhan shaikh birthday write shrikant bhadale art