सैफनं माझं आयुष्य बदललं पण शाहिदनं...

करिनाची लव्ह लाइफ एकेकाळी चांगलीच गाजली होती. करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या डेटिंग आणि ब्रेकअप दोन्हीच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या.

मुंबई: बॉलिवूड मधील अभिनेत्री करिना कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. करिनाची लव्ह लाइफ एकेकाळी चांगलीच गाजली होती. करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या डेटिंग आणि ब्रेकअप दोन्हीच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. दोघांनीही शेवटचं 'जब वी मेट' या चित्रपटात काम केलं होतं. पण या चित्रपटानंतर दोघांनीही आपले मार्ग बदलले. त्यानंतर करिनानं सैफ अली खानसोबत 'टशन' चित्रपटात काम केलं. पण या दोन्ही चित्रपटांनी आपलं आयुष्य बदलून टाकल्याचं करिनाने सांगितले आहे.

कान्हूरच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला सव्वा लाखांची मदत

अनेक चाहत्यांना माहीत आहे की, शाहिद कपूरनंच करिनाची 'गीत' या भूमिकेसाठी शिफारस केली होती. आता करिनानंही हे खरं असल्याचं मान्य केलं आहे. त्यावेळी शाहिदनं 'जब वी मेट'मध्ये माझ्यासाठी भूमिकेची विचारणा केल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यावेळी करिनाच्या करिअर आणि वैयक्तीक आयुष्यालाही नवं वळणं मिळालं होतं. ज्याबद्दल ती आजही बोलते.

Video: सर्पमित्रांकडून चक्क १८ नागाच्या पिलांना जन्म...

करिना म्हणते की, 'अर्थात 'टशन' चित्रपटानं माझं आयुष्य बदलून गेलं. मी सैफला या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.' करिना आणि सैफ यांच्या लव्हस्टोरीला याच चित्रपटाच्या सेटवर सुरुवात झाली होती. त्याचवेळी करिना 'जब वी मेट'चं शूटिंग करत होती. या दोन्ही चित्रपटांनी करिनाचं आयुष्य बदलून टाकलं.

मंगलदास बांदल व शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात तिघा अधिकाऱ्यांना अटक

याबाबत बोलताना करिना म्हणाली की, 'मी यशराज फिल्मचा चित्रपट 'टशन' चं शूटिंग करत होते. पण त्याचवेळी दुसरीकडे 'जब वी मेट' चं शूटिंग सुरु होतं. जेव्हा मी या सेटवर असायचे तेव्हा नेहमीच, मी अक्षय कुमार, अनिल कपूर आणि सैफ अली खान यांच्यासोबत काम करतेय. मी मुख्य भूमिकेत आहे. साइझ झीरो होणार आहे, बिकिनी घालणार आहे. मी वजन कमी केलं आहे, अशा गप्पा मारत असे. 'जब वी मेट' च्या सेटवर मी अशाच मूडमध्ये असे.'

मंगलदास बांदलच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला...

'पण माझ्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं. 'जब वी मेट' आणि 'टशन' दोन्ही चित्रपटामध्ये माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. 'जब वी मेट'नंतर एकीकडे शाहिद आणि मी वेगळे झालो आणि दुसरीकडे चित्रपट सुपरहिट झाला. 'टशन' चित्रपटानं माझं आयुष्य बदललं. मी सैफला भेटले. मला वाटलं होतं की 'टशन'मुळे माझं करिअर आणि लाइफ दोन्ही बदलेल. पण शाहिदच्या 'जब वी मेट' नं माझं करिअर आणि सैफच्या 'टशन' नं माझं आयुष्य बदललं. मला माझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला आणि मी त्याच्याशी लग्न केलं.'

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Saif changed my life but Shahid