'रुग्णालयाने केवळ पैसे उकळण्यासाठीच केले उपचाराचे नाटक'

मला असं वाटतंय की वडिलांचे निधन आधिच झाले होते. परंतु, केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांनी उपचाराचे नाटक केले.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर रात्रं-दिवस काम करताना दिसत आहेत. पण, काही ठिकाणी रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळे अनुभवही येऊ लागले आहेत.

कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेत्री संभावना सेठ हिन देखील आपल्या वडिलांना गमावले. 8 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे संभावनाच्या वडिलांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु वडिलांच्या निधनासाठी संभावना हिने रुग्णालयाला जबाबदार धरलं आहे. त्यांनी योग्य प्रकारे उपचार केले नाहीत म्हणून वडिलांचे निधन झाले असा आरोप तिने केला आहे. शिवाय, तिने रुग्णालयाला थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

May be an image of text

बहिणीच्या दशक्रियेदिवशीच कोरोनाने घेतला भावाचाही बळी...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संभावना रुग्णालयावर प्रचंड संतापली आहे. त्या रुग्णालयात रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. केवळ पैसे उकळले जातात. शिवाय घरच्यांनी काहीही विचारल्यास त्यांना योग्य उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळं संभावनानं कायदेशीर रुग्णालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

May be an image of text

हृदयद्रावकः कारेगावमधील तीन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

संभावना म्हणाली, 'कोरेना पॉझिटिव्ह आल्यानंतर 30 एप्रिल रोजी माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्यांच्या काही रक्त चाचण्या घेतल्या आणि काही दिवसातच ते बरे होतील अशी ग्वाही दिली. म्हणून आम्ही देखील शांत झालो. काही दिवसांनंतर माझा भाऊ वडिलांना भेटायला गेला, तेव्हा त्यांचे हात बांधलेले पाहून आम्हाला धक्का बसला. त्याने लगेच पप्पांचे हात उघडले आणि रुग्णालयाकडे त्याबद्दल चौकशी केली. तर, त्यांनी सलाईन काढू नये, म्हणून तसे केले आहे, असे सांगण्यात आले. या बाबत मी एक व्हिडिओ देखील तयार केला होता. परंतु रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तो व्हिडिओ हटवण्यास मला भाग पाडले. मला असं वाटतंय की वडिलांचे निधन आधिच झाले होते. परंतु, केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांनी उपचाराचे नाटक केले." दरम्यान, संभावनाच्या या आरोपांवर रुग्णालयातील प्रशासनाने अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Sambhavna Seth says her father was medically murdered
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे