सणसवाडीच्या युवकाची युके मध्ये शिक्षणासाठी निवड; पण...

युवकाला हवा शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात

सणसवाडी येथील सतीश आठवले या युवकाने आपले पहिली ते चौथी शिक्षण सणसवाडी जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले आहे.

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील सतीश अशोक आठवले या युवकाने लहानपणापासून परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न बाळगले होते. अखेर या युवकाची सध्या यु के (स्कॉटलंड) मध्ये शिक्षणासाठी निवड झाली असून, त्याला शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय मुलांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे; कुसुम मांढरे

सणसवाडी येथील सतीश आठवले या युवकाने आपले पहिली ते चौथी शिक्षण सणसवाडी जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले आहे. पाचवीचे शिक्षण शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेतून घेत पाचवीमध्ये असतानाच शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देत येथे बाजी मारली आणि सतीशची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्यामुळे त्याने उच्चशिक्षणाचे स्वप्न पाहत सहावी ते बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण शासकीय जवाहर नवोदय विद्यालयातून पूर्ण केले. २०१५ साली बारावीची परीक्षा देत बारावी मध्ये ७४ टक्के गुण मिळविले. त्यांनतर उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न उरासी बाळगून सतीशने मुंबई येथील भारती विद्यापीठात इंजिनीअर साठी प्रवेश मिळविला तेथे चार वर्षाचे शिक्षण २०२० मध्ये पूर्ण केले.

शिक्रापुरातील कोविड सेंटर रुग्णाअभावी निरोप समारंभाने बंद...

May be an image of text that says

जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा साखर कारखान्याची फसवणूक

दरम्यान, कोविड मुळे शेवटची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होत निकाल उशिरा जाहीर झाला. यावेळी सतीश याने बाहेर देशात शिक्षण घेण्याचे प्रयत्न सुरु करत इतर देशातील शिक्षणाची माहिती मिळवीत यु के मधील विद्यालयांच्या वेबसाईट वर माहिती तसेच शालेय कागदपत्रे अपलोड करत प्रवेशासाठी प्रयत्न केले. अखेर मे २०२१ सतीशचा यु के (स्कॉटलंड) मधील विज्ञान डीस्टीलिंग उद्योजकता या उच्च पदवीधर शिक्षणासाठी निवड झाली आहे. सदर शिक्षण पूर्ण होताच सतीश पुढे जाऊन व्याप्ती आणि महत्वकांक्षा संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत होऊ शकतो.

शिरुर तालुक्यातील या गावात एक हजार झाड लावण्याचा अभिनव उपक्रम...

उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सतीशचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. मात्र, यु के मधील शिक्षणासाठी त्याला तब्बल पस्तीस लाख रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, परिस्थिती हलाखीची असताना देखील सतीशची आई रमाबाई आठवले व वडील अशोक आठवले यांनी आपल्या नातेवाईक व मित्रांकडून काही आर्थिक मदत गोळा केली आहे. रक्कम मोठी असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागली आहे. मात्र, सदर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाल्यास सतीशचे उच्चशिक्षणाचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे सतीशच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

शिरुर तालुक्यातील या गावात एक हजार झाड लावण्याचा अभिनव उपक्रम...

आर्थिक मदत साठी बँकेची माहिती...
खातेदार नाव - सतिश अशोक आठवले,
बँकेचे नाव - सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,
शाखा खारघर नवी मुंबई,
आय एफ एस सि कोड - CBIN0284517 असे असून शालेय मदतीसाठी दानशुरांनी सदर बँक खात्यावर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वरुडेमधील मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिला मदतीचा हात!

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: sanaswadi satish aathwale need money for uk education