सावकारकीला कंटाळून मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील कटुंबाची व्यथा

शिरुर तालुक्यातील एका कुटुंबाने सावकारांच्या त्रासाला कंटाळून योग्य ती कारवाई करावी अथवा सामूहिक आत्महत्येस परवानगी द्यावी, असे पत्र मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि शिक्रापूर पोलिस निरीक्षक यांना लिहीले आहे.

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील एका कुटुंबाने सावकारांच्या त्रासाला कंटाळून योग्य ती कारवाई करावी अथवा सामूहिक आत्महत्येस परवानगी द्यावी, असे पत्र मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि शिक्रापूर पोलिस निरीक्षक यांना मंगल सुरेश भुजबळ (रा. तळेगाव ढमढेरे , ता. शिरुर जिल्हा पुणे) यांनी लिहिले आहे.

करंदीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर...

शिरुर तालुक्यातील एका कुटुंबातील महिलेने पत्रातून आपली कैफीयत मांडली आहे. या पत्रामध्ये सावकार आपल्याला कशा पद्धतीने त्रास देतात याचे सविस्तर कथन केले आहे. सावकाराच्या त्रासाला कंटाळून कुटंबातील कर्त्या पुरुषाने विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे. पण रुग्णालयातून घरी आल्यानंतरही सावकार मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. तसेच संबंधित सावकारांनी कोरे चेक, कागदपत्रांवर सह्या घेतल्या आहेत. शिवाय वारंवार घरी येऊन कुटुंबाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी करत आहेत. संबंधित व्यक्तीचा गॅरेजचा व्यवसाय असुन पैशासाठी संबंधित सावकाराने गॅरेजचे शटर बंद करुन आतमध्ये डांबले होते.

कान्हुरच्या पाणी प्रश्नासाठी ग्रामस्थांनी घेतली वळसे पाटलांची भेट...

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी रितसर तक्रार दाखल करुन घेत नाही. शिवाय, शिक्रापूर पोलिस ठाण्यातील एक पोलिस हवालदार संबंधित सावकाराच्या जवळचा असल्यामुळे संबंधित पोलिसही आम्हाला त्रास देत आहे, असाही उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. "आमचे कुटुंब सावकारांच्या त्रासाला कंटाळले आहे. सावकार व त्यांचे हस्तक यांच्यापासून कुटुंबाला धोका असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करावी किंवा कुटुंबास सामूहिक आत्महत्येस परवानगी द्यावी" अशी मागणी पिडीत कुटुंबातील मंगल भुजबळ यांनी पत्राद्वारे संबंधितांकडे केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Savkarkila Kantaloon Magitali Mass Suicide Perversion