गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करा: यशवंत गवारी

शिरूर तालुका

शिक्रापूर हद्दीतील गणेश मंडळ व पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन

शिक्रापूर (शेरखान शेख): तब्बल 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना सर्वच गणेशोत्सव मंडळे तयारीला लागलेले आहेत.मात्र साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत तसेच सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळ, पोलीस पाटील, सरपंच यांना गणेशोत्सव उत्सवाबाबत मार्गदर्शन करताना शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी बोलत होते.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस नाईक संदीप कारंडे, अशोक केदार, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, सुभाष खैरे, आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, जयसिंग भंडारे, किरण काळे, प्रकाश करपे, संतोष लेंडे, आत्माराम डफळ, रुपाली भुजबळ, वंदना साबळे, मालन गव्हाणे, सोनाली वाजे, सरपंच मोनाली ढोकले, नवनाथ माळी, नंदकुमार गोडसे, मोहननाना वाजे, अशोक भुजबळ यांसह आदी पदाधिकारी यांसह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतर्क पाहून बाहेरील अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोरोना मध्ये अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून त्यांना मदत करत शालेय उपक्रम राबवावे, गणपती मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले.

न्यायालयाच्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असून ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे, गणपती मंडळ जवळ स्वयंसेवक नेमावे आणि होणारा उत्सव शांततेत पार पाडावा असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस हवालदार संदीप कारंडे, अशोक केदार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले.