शिक्रापुरात महिलांची फसवणूक करत विनयभंग

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महिलांची लघु उद्योग व्यवसायात फसवणूक करुन पैसे मागण्यासाठी आलेल्या महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गणेश सासवडे व सचिन पाटेकर यांनी सुवर्णज्योत एन्टरप्रायेजसच्या माध्यमातून लघु उद्योग करणाऱ्या महिलांकडून काही पैसे घेत महिलांना एक प्रोजेक्ट देऊन त्याबाबतच्या मशिनरी व साहित्य दिले होते, त्यांनतर काही दिवसांनी सासवडे व पाटेकर यांनी महिलांना काहीही माहिती न देता सदर प्रोजेक्ट बंद केला त्यामुळे महिला वारंवार पैशाची मागणी करत असताना त्यांना वेळोवेळी पुढच्या महिन्यात पैसे देऊ सांगण्यात आले.

मात्र महिलांना पैसे न दिल्याने दोघी महिला गणेश सासवडे व सचिन पाटेकर यांच्या सुवर्णज्योत एन्टरप्रायेजसच्या ऑफिसमध्ये गेले असता काही वेळाने गणेश सासवडे व सचिन पाटेकर हे दोघे तेथे आले. दरम्यान महिलांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत महिलांना अश्लील शिवीगाळ करत महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश सासवडे व सचिन पाटेकर दोघे रा. विघ्नहर्ता कॉलनी हिवरे रोड शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उज्वला गायकवाड करत आहे.