प्राथमिक आरोग्य उपकेद्रांच्या चांगल्या सेवेमुळे नागरीकांमध्ये समाधान: सोनाली खैरे

शिरूर तालुका

सविंदणे: सविंदणे (ता. शिरुर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये तेथील डॉक्टरांकडून चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने नागरीकांची दवाखान्यासाठी बाहेरगावी होणारी धावपळ थांबली असून आर्थिक बचतही होत असल्याने गावातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे सरपंच सोनाली खैरे यांनी सांगितले आहे.

कवठे (ता. शिरुर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सविंदणे येथे हे उपकेंद्र चालू असून समुदाय आरोग्य आधिकारी डॉ. कोमल राठोड ह्या गरीब व गरजू रुग्णांसहीत बालकांसह जेष्ठ नागरीकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देत आहे. रक्तदाब, मधूमेह, गरोदर बायकांच्या तपासणी त्यांना रक्त वाढीच्या गोळ्या, एड्स, डेंग्यू टेस्ट, लहान मुले तपासणी, टी.बी पेशंट,क्षयरोय तपासणी अश्या प्रकारच्या सेवा चांगल्या प्रकारे त्या गावामध्ये विविध कॅम्प द्वारे राबवत आहे. रात्री अपरात्री रुग्णांना गोळ्या, औषधे या आरोग्य केंद्रात ऊपलब्ध होत आहे.

डॉ . कोमल राठोड या बालकांसह वयोवृद्ध नागरीकांवर विशेष लक्ष देवून गेल्या अडीच वर्षापासून व्यवस्थित उपचार करत आहे. त्यामुळे बाहेरगावी होणारी धावपळ थांबली असून आरोग्य उपकेंद्रात वेळेवर प्राथमिक उपचार मिळत आहे. दररोज ३०ते ३५ रुग्ण या उपआरोग्य केंद्रात उपचार घेत आहे, असे जेष्ठ नागरीक ज्ञानेश्वर पडवळ यांनी सांगितले.