सणसवाडीत कंपनी कामगारांनी लांबवले चार लाखांचे पार्ट

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स ऑटो इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी एका वाहन चालकाच्या मदतीने तब्बल 4 लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भिकू बिगुराम चव्हाण, विजय सखाराम पडघन, महेश बाळासाहेब थिटे व शाम लक्ष्मण सूर्यवंशी या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स ऑटो इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कंपनीत चार चाकी वाहनांचे गिअरचे पार्ट बनवले जात असून सदर कंपनीमध्ये कंपनीतील साहित्य ठेवलेल्या ठिकाणी काही साहित्य नसल्याचे कंपनी व्यवस्थापकांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी साहित्यांची चौकशी करत CCTV तपासात काही कामगारांना विश्वासात घेऊन चर्चा केली असता कंपनीतील काही कामगारांनी एका वाहन चालकाच्या मदतीने कंपनीतील तब्बल 4 लाख रुपये किमतीच्या साहित्यांची चोरी केल्याचे सांगितले.

याबाबत मोहम्मद शकील कुरेशी (वय ४६) रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी भिकू बिगुराम चव्हाण रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे, विजय सखाराम पडघन व शाम लक्ष्मण सूर्यवंशी दोघे रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे, महेश बाळासाहेब थिटे रा. केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.