महाराष्ट्र दिनानिमित्त श्री महागणपती ला चंदनाचा लेप व १००१ चिक्कू फळांचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने (दि 1) मे रोजी महागणपतीला मृदू तसेच पवित्र चंदन उटी करण्यात आली.

सोमवार (दि. 1) मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पहाटे अभिषेक, तसेच दुपारी 12 वाजता महानैवेद्य व महापुजा मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त गणेश भक्त सुरेंद्र वधवा भोसरी यांच्यातर्फे महागणपतीला चंदन ओटी फुलांची सजावट करण्यात आली. तसेच गणेश भक्त सचिन दुंडे यांच्यातर्फे महागणपतीला 1001 चिक्कू फळांचा महानैवेद्य करण्यात आला. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.

यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी, देवस्थान कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.