मोबाईल पासवर्डही ठरतोय सुखी संसारात अडथळा, कसा तो पहा…

क्राईम
मुंबई: पती-पत्नीतील वाद हा नवा नाही. सामानाची यादी-खरेदी, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी, नवीन वस्तूची खरेदी, आर्थिक परिस्थिती अशा कित्येक कारणांमुळे असे वाद घडताना दिसतात. पण अलीकडे हे वाद मिटवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकत्रित कुटुंबापासून अलिप्त राहणार्‍या उच्चशिक्षित दाम्पत्यांच्या भांडणात माघार कोण घेणार, यावरुन हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू लागला आहे.
कोरोना काळात अनेकांनी झटपट लग्नाचे निर्णय घेतले. या काळात झालेल्या लग्नावेळी मुलगा पुणे, मुंबईत नोकरीला होता असे सांगण्यात आले होते. पण तिकडची नोकरी गेल्याने अनेक मुले नव्याने काही व्यवसाय करु लागली. असे अनेक तरुण आपापल्या गावात, शहरात स्थिरावत आहेत. पण लग्नावेळी पुणे, मुंबईत नोकरीची खोटी माहिती का दिली, आमची मुलगी तिकडे राहणार होती, अशा तक्रारी पालक घेऊन येत आहेत.
फोनचा पासवर्ड सांगत नाही
पतीचे (वय 54), तर पत्नीचे (वय 50) प्रेमविवाह झालेल्या या दाम्पत्यामध्येही वाद झाला. या वादाचे कारण ठरले ते म्हणजे मोबाईल पासवर्ड. लग्नाला 30 वर्षांचा काळ लोटल्यानंतरही एकमेकांवर मोबाईलवरुन घेतला जाणारा संशय खर्‍याअर्थाने सर्वांनाच विचार करायला लावणार आहे.