शिरुरमध्ये रस्ते सुरक्षा अभियान साजरे

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीसांनी व नागरिकानी एकत्रित येवुन रस्ते सुरक्षा अभियान यशस्वी व्हावे. या करता प्रयत्न करावेत व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांनी केले. शिरुर पोलीस स्टेशनचा वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, एकनाथ पाटील, वाहतुक पोलीस राजेंद्र वाघमोडे, शेखर झाडबुके, भाग्यश्री जाधव, यांच्यासह जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, कॉग्रेस आयचे शहाराध्यक्ष ॲड किरण आंबेकर, सुवर्णकार समाजाचे शिरुर शहर अध्यक्ष राजेंद्र लोळगे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, तर्डोबावाडीचे माजी सरपंच जगदीश पाचर्णे, सामाजिक कार्यकर्ते बापु सानप, अनिल बांडे, सागर नरवडे, अविनाश घोगरे व पत्रकार बांधव उपस्थित होते.

विनोद भालेराव म्हणाले की अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देवु नये व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. संजय बारवकर यानी ही शहरातील वाहतुकी संदर्भात सुचना मांडल्या. पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, ॲड किरण आंबेकर, प्रा सतीश धुमाळ व बापु सानप आदीनी यावेळी सुचना मांडल्या. राजेंद्र वाघमोडे यानी वाहतुकी संदर्भतील विविध नियमांची माहिती दिली .