ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते.

इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी पोलीस ठाणे तपास पथक व टाकळीहाजी पोलीस चौकीचे अधिकारी अंमलदार यांना सांगुन त्याप्रमाणे तपास पथकाने चोरांचा कसून शोध घेवून सदर इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे आरोपी व्यक्ती नामे १) पांडुरंग शिवाजी बोडरे (वय २1) २) मोन्या उर्फ कुलदिप बबन बोडरे (वय २२) दोघे रा. रावडेवाडी (ता. शिरूर) जि. पुणे यांना पकडुन त्यांचेकडुन सुमारे १६ इलेक्ट्रीक पाणी उपसा मोटारी जप्त करण्यात आल्या होते. व त्यांना ९ गुन्हयात अटक करून कोर्टात हजर केले होते.

त्याची अंकीत गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी गंभीर दखल घेवुन सदर आरोपीतांना १ वर्षाकरीता पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहर हददीसह अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन (दि. २७) एप्रिल पासून तडीपार करण्यात आले आहे व यापुढील कालावधीतही शेतक-यांचे इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार करणेकामी यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग व सुरेशकुमार राउत पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, अमोल पन्हाळकर सहा पोलीस निरीक्षक, एकनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक, सुनिल उगलेपोलीस उपनिरीक्षक, अभिजित पवार पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार परशराम सांगळे यांनी कामकाज पाहीले आहे.