Shikrapur Police Station

सणसवाडीत किरकोळ वादातून परप्रांतीयाचा खून; एक तासात आरोपी अटक

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनी जवळ किरकोळ वादातून एका पर प्रांतीयाचा खून झाल्याची घटना घडली असताना अवघ्या एक तासाच्या आत शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले सदर घटनेत गंभीर गया सिंग असे खून झालेल्या इसमाचे नाव असून सचिन उर्फ आफऱ्या अंकुश गायकवाड असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

सणसवाडी येथील जॉन डियर कंपनी जवळ गंभीर सिंग याचे टायरचे दुकान असून सचिन नेहमी सिंग याच्या दुकानावर येत होता. नेहमीप्रमाणे सायंकाळच्या सुमारास सचिन दुकानावर आलेला असताना त्याने गंभीर सिंग याचेकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सिंग याने पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला यावेळी सचिन याने दुकानातील लोखंडी टामी घेऊन गंभीरच्या पाठीवर, मानेवर, डोक्यात मारहाण केली, येथील नागरिक गोळा होऊ लागल्याचे सचिन पळून गेला काही वेळात गंभीर स्थानिक नागरिकांनी गंभीर याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गंभीर गया सिंग (वय ४५) रा.सणसवाडी जॉन डियर कंपनी शेजारी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सिंगेयाहे पोस्ट रामपूर रामहर जि. बैसाली बिहार याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, संदीप कारंडे, पोलीस नाईक अमोल दांडगे, जयदीप देवकर, निखील रावडे, उद्धव भालेराव यांनी तातडीने सूत्रे हलवत पळून गेलेल्या सचिन उर्फ आफऱ्या अंकुश गायकवाड (वय ३०) रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यास घटना घडल्यानंतर एका तासाच्या आत ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने पैसे न दिल्याने मारहाण केल्याची कबुली देखील दिली.

याबाबत विकासकुमार गंभीरसिंह (वय २०) रा. सणसवाडी जॉन डियर कंपनी शेजारी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सिंगेयाहे पोस्ट रामपूर रामहर जि. बैसाली बिहार याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सचिन उर्फ आफऱ्या अंकुश गायकवाड रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. याच्यावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे करत आहेत.