शालेय मुलांना शाळेचा अभिमान असावा; प्रकाश धारिवाल

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख) शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मुलांनी आपल्या गुरूंची शिकवण व शिस्त लक्षात ठेवावी आणि प्रत्येकाला आपल्या शाळेबाबत अभिमान असावा त्यामुळेच आपले व्यक्तिमत्व घडते असे मत प्रसिद्ध उद्योजक व शिरुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले.

शिक्रापुर येथील विद्याधाम प्रशाला येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून ए आय एम योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या अटल टिकरिंग लॅबच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक प्रकाश धारिवाल बोलत होते. यावेळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, चेअरमन प्रकाश बोरा, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम मांढरे, शिरुर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे, विशाल खरपुडे, प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष उत्तम शेटे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ मांढरे, सोमनाथ भुजबळ, बाळासाहेब लांडे, अंकुश घारे यांसह आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना धारीवाल पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणाकडे लक्ष देऊन चांगले व दर्जेदार शिक्षण घ्यावे. कारण शिक्षण व व्यवसायाला काही मर्यादा असतात. विद्यार्थ्यांना आज उद्घाटन झालेल्या आधुनिक शिक्षणाचा फायदा करुन घेण्याचे आवाहन देखील केले. दरम्यान प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी प्रशालेचा सर्व लेखाजोखा मांडला, यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले असता माजी उपसरपंच सुभाष खैरे यांनी विद्याधाम शाळेच्या कमिटीवर स्थानिक नागरिकाला घेण्याची विनंती केली तर उपसरपंच मयूर करंजे यांनी शालेय मुलांच्या मोबाईल वापरावर आवर घालण्याची मागणी केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कुंभार यांनी लकेले तर प्रास्ताविक प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी केले आणि पर्यवेक्षक संजय शेळके यांनी आभार मानले.