छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 87 शाळा बोगस….

महाराष्ट्र

औरंगाबाद: नुकतेच राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आली, आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा बोगस असल्याचे समोर आले असून शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या बोगस शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या संस्थाचालकांना पत्र पाठवल्यानंतर जिल्ह्यात सीबीएसई, आयसीएसईची मंडळाची मान्यता प्रस्तावित असल्याच्या एकूण 87 शाळा शहरात असल्याचे शिक्षण विभागाला आढळून आले होते. पुढे शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत यापैकी 18 शाळांकडे एनओसी, तर 17 शाळांकडे मान्यताच नाही, तसेच उर्वरित 52 शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. मात्र असे असताना देखील नवीन शैक्षणिक वर्षासाठी या शाळांमध्ये भरमसाट शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

पालकांनो बोगस शाळा अशी ओळखा..!

पालकांनी मुलांचे ॲडमिशन करताना शाळेकडे संबंधित बोर्ड आणि शासन मान्यतेची चौकशी करावी.

तसेच संबंधित शाळेकडे शासनाने दिलेला मान्यता आदेश क्रमांक तपासून घ्यावा.

शाळांनी सर्व माहिती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावली आहे का? हे पालकांनी तपासून घ्यावे.

मुलांचे ॲडमिशन करताना संबंधित शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळेची चौकशी करून घ्यावी.