कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वैभव देशमुख यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला आहे. देशमुख पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक तसेच मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे 31 मार्च 2023 रोजी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची ई मेलद्वारे तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याचे बोलले जात आहे.