रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार आहेत. कंपनीमध्ये जातांना-येतांना त्यांना अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरी मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली होती. याबाबत रांजणगाव पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली असुन त्यांच्या 82 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल रांजणगाव MIDC पोलीसांनी केली जप्त केली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी MIDC परिसरात दररोज साध्या वेषात तसेच सरकारी वाहनातुन गणवेषामध्ये पेट्रोलींग सुरु केली असुन घडलेले गुन्हे उघडकिस आणण्यासाठी तपास पथकास सुचना दिलेल्या होत्या. दि 5 मार्च 2024 रोजी रांजणगाव येथुन फिर्यादी गजानन सुखलाल राऊत हे पायी चालत जात असतांना त्यांना तीन अनोळखी इसम दुचाकीवरुन येवुन कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल चोरी करुन नेला होता. तसेच दि 9 मार्च 2024 रोजी फिर्यादी मोहम्मदहुसेन मंसुरी हे MIDC मधील पेप्सिको कंपनी समोरुन जात असतांना त्यांना दुचाकीवरुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम चोरुन नेली होती.

 

सदरचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे तांत्रिक माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील आरोपी 1) इस्तेखार इंतेजार शेख (वय 19) रा.चितळेरोड, दत्त बेकरी, ता. जि. अहमदनगर, 2) राजेश भगवान पाखरे (वय 19) रा. गाईकेमळा, रेल्वे स्टेशन, ता.जि.अहमदनगर, 3) गुरप्रित श्रीपती घोडके (वय 19) रा. नेमाणे ईस्टेट, केडगाव देवी रोडी, ता. जि. अहमदनगर यांना दि. 25 मार्च 2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे.

 

या आरोपीकडे तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारे शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत 1, कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत 1 व रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत 02 असे एकुण 4 गुन्हे केल्याचे उघडकीस आले असुन त्यांच्याकडुन एकुण 82 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्कुटी मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, वैज्जनाथ नागरगोजे, तेजस रासकर यांनी केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय शिंदे व तेजस रासकर हे करत आहेत.