शिरुर तालुक्यात पतसंस्थेच्या चेअरमन व सचिवाने केला सव्वीस लाखांचा अपहार

क्राईम शिरूर तालुका

वढू बुद्रुकच्या झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेचा प्रकार

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन व सचिवाने संगनमत करुन पतसंस्थेतील तब्बल 26 लाख रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे व्हाईस चेअरमन कैलास सोपान मुंगसे व सचिव मोहन गंगाराम ढगे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कंपनीच्या व्यवस्थापक व कामगारांची झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्था असून सदर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन कैलास सोपान मुंगसे व सचिव मोहन गंगाराम ढगे हे दोघे कामकाज पाहत आहेत, सदर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी उपलेखापरीक्षक किरीन मोरे यांची नेमणूक करण्यात आलेली असताना त्यांनी सदर पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले असता झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन कैलास सोपान मुंगसे व सचिव मोहन गंगाराम ढगे या दोघांनी संगनमत करुन पतसंस्थेच्या कोरेगाव भीमा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून धनादेशाद्वारे तब्बल 26 लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले.

सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक किरण ज्ञानदेव मोरे (वय ४८) रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन कैलास सोपान मुंगसे रा. रासे ता. खेड जि. पुणे व सचिव मोहन गंगाराम ढगे रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.