Gas Cylinder

महागाई! घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ…

महाराष्ट्र

मुंबई: घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून, सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणीत कोलमडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाई वेगाने वाढत आहे. दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात आज (मंगळवार) 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 14 KG LPG सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर मुंबईत 1052.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये दर झाला आहे.

1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.