शिक्रापूर सह परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी

शिरूर तालुका

नमाज पठाण करत मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) परीसरातील सणसवाडी, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखई, कान्हूर मेसाई, निमगाव म्हागी, जातेगाव, कोंढापुरी, कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी आदी ठिकाणी बकरी ईद निमित्ताने मोठ्या उत्साहात नमाज पठण करुन बकरी ईद साजरी करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बकरी ईद सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. बकरी ईद हा सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे तसेच बलीदानाचे प्रतिक मानले जाते. परिसरातील प्रत्येक मुस्लीम बांधवानी नमाज पठन करत बकरी ईद साजरी केली. शिक्रापूर येथील जामा मस्जिद येथे मोठ्या उत्साहात नमाज पठन करण्यात आले.

unique international school
unique international school

समाज बांधवांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्य मस्जिद येथे तीन टप्प्यात तर पाटवस्ती येथील मस्जिद मध्ये एका टप्प्यात नमाज पठन करण्यात आले. बकरी ईद निमीत शिकापूर सह प्रत्येक परिसरात शांतता राहण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तसेच मुस्लिम बांधवांना नमाजला जाताना व येताना रस्ता ओलांडताना अडथळा येवू नये म्हणून वाहतुकीचे सुयोग्य नियोजन देखील शिक्रापूर पोलिसांनी केले होते. नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी व सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी मुस्लीम बांधवांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली अनेक ठिकाणी मस्जिद मध्ये मुस्लीम बांधवाना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.